नाशिक : गंगापुर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. गंगापुर प्रकल्पाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रामधुन गोदावरी नदीमधे होळकर पुलाजवळ 7000 क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पावसाचा जोर पुढचे काही दिवस असाच राहणार असल्याने गंगापुर धरणामधून आज गंगापूर धरणातून 3000 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामूळे होळकर पुलाजवळ गोदावरी नदीत पाण्याची पातळी वाढणार असल्याने नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे अशा सुचना नागरिकांना प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.
कडवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी 1:00 वा कडवा धरणातून 4150 क्युसेक्स विसर्ग कडवा नदीपात्रात सोडण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.