RTO Bus Inspection : रस्‍त्‍यावर धावणाऱ्या 31 टक्‍के खासगी बस सदोष; आरटीओच्‍या तपासणीत धक्‍कादायक माहिती समोर

Ongoing inspection of private buses in a special drive by Regional Transport Office.
Ongoing inspection of private buses in a special drive by Regional Transport Office. esakal
Updated on

RTO Bus Inspection : खासगी बसच्या वाढत्‍या अपघातांच्‍या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खासगी प्रवासी बस विशेष तपासणी केली जाते आहे. या मोहिमेत अनेक धक्‍कादायक बाबी समोर आलेल्‍या आहेत.

आठवडाभरात तपासलेल्‍या ४६२ बसपैकी १४३ बस सदोष आढळल्‍या असून, हे प्रमाण तब्‍बल ३१ टक्‍के आहे. यामुळे प्रवाशांच्‍या जिवाशी सुरू असलेला खेळ उघड झालेला आहे. (31 percent of private buses running on road are defective inspection by rto nashik news)

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पंधरा दिवसांची विशेष मोहीम राबविली जाते आहे. १ जुलैपासून सुरू केलेल्‍या या मोहिमेत आठवड्याभरानंतर धक्‍कादायक माहिती समोर येते आहे. खासगी प्रवासी बसच्या विशेष तपासणी मोहिमेत शुक्रवार (ता. ७) पर्यंत एकूण ४६२ बसची तपासणी केली आहे.

यामध्ये एकूण १४३ वाहने दोषी आढळून आले आहेत. यांच्यावरील दंडात्मक कारवाईमध्ये आतापर्यंत २ लाख ५२ हजार ५०० रुपये इतका दंड आणि चार लाख ६५ हजार रुपये कर स्वरूपात वसुल करण्यात आला आहे. तसेच त्यापैकी ६ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जप्त करण्यात आल्‍या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ongoing inspection of private buses in a special drive by Regional Transport Office.
Sharad Pawar Latest Update : मोठ्या साहेबांची सभा नव्या राजकीय समीकरणांची नांदी! सभेला शिवसेनेचे हे आमदारही सरसावले

आढळलेले दोष असे..

मोहिमेमध्ये बसमध्ये विविध दोष आढळले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वेग नियंत्रकामध्ये छेडछाड, अग्‍निशमन यंत्रणा नसणे, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, अवैधरीत्या टप्पा वाहतूक, अवैध मालवाहतूक करणाऱ्या बस, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या, योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या, जादा भाडे आकारणाऱ्या व रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर आदी तसेच मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यानुसार तपासणी करताना कारवाई केली आहे.

नियमित तपासणी का नाही?

आरटीओ कार्यालयामार्फत नियुक्‍त पथकांकडून नियमित तपासणी करणे अपेक्षित आहे. असे असताना नियमित तपासणी न होण्यामागे काय ‘अर्थ’ आहे, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जातो आहे. आणि जर या पथकांकडून नियमित तपासणी होत असेल, तर रस्‍त्‍यावर सदोष वाहने धावतातच कशी, असा प्रश्‍नदेखील उपस्‍थित केला जातो आहे. प्रवाशांच्‍या जिवाशी खेळ थांबवत विभागाकडून कठोरतेने कारवाईची मागणी होते आहे.

Ongoing inspection of private buses in a special drive by Regional Transport Office.
11th Admission Deadline : अकरावी तिसऱ्या फेरीच्‍या नोंदणीची उद्यापर्यंत मुदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.