Sahyadri Farmsमध्ये 310 कोटींची परकीय गुंतवणूक; देशातील पहिली वेळ

Sahyadri Farms Logo
Sahyadri Farms Logoesakal
Updated on

नाशिक : येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची १०० टक्के मालकी असलेल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट केअऱ लिमिटेड या कंपनीमध्ये ३१० कोटींची थेट परकीय गुंतवणूक युरोपातील गुंतवणूकदारांच्या समूहाने केली. इंकोफिन, कोरीस, एफएमओ आणि प्रोपार्को यांचा या गुंतवणूकदारांमध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांना आपला व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत स्वरूपात चालवण्याच्या सहयाद्रीच्या भूमिकेवर या गुंतवणुकीने शिक्कामोर्तब केले.

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत सहाय्य देणारे सह्याद्री फार्म्स हे ग्रामीण उद्योजकतेचे उत्तम उदाहरण आहे. २०१० मध्ये दहा शेतकऱ्यांच्या छोट्या गटाने एकत्र येत द्राक्षे युरोपात निर्यात केली. हा शेतकऱ्यांचा समूह सह्याद्री फार्म्सच्या रुपाने देशातील आघाडीची फळे आणि भाजीपाला निर्यात आणि प्रक्रिया करणारी कंपनी बनली. नऊ पिके, १८ हजार शेतकरी आणि ३१ हजार एकराहून अधिक क्षेत्रावर सह्याद्रीचा विस्तार झाला आहे. (310 crore foreign investment in Sahyadri Farms First time in country Nashik Latest Marathi News)

परकीय गुंतवणुकीचा उपयोग

कोरीस, एफएमओ, प्रोपार्को आणि इंकोफिन यांच्याकडून सह्याद्री फार्म्समध्ये केली जाणारी भांडवली गुंतवणूक ही शेतकऱ्यांच्या कंपनीची आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. सह्याद्रीला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वृद्धींगत करायची आहे.

तसेच प्रक्रिया पश्चात कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी बायोमास प्रकल्प आणि पॅक हाऊस सारख्या पायाभूत सुविधा वाढवायच्या आहेत. त्यासाठी या गुंतवणुकीचा उपयोग केला जाईल. गुंतवणुकीच्या क्रियेत ‘अल्पेन कॅपिटल’ने सह्याद्रीसाठी विशेष धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केले.

"शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना उद्योजकांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या विचारप्रवृत्त करणे ही सह्याद्री फार्म्सची मूळ संकल्पना. प्रत्येक लहान आणि सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर आणि व्यावहारिक व्यवसाय बनावा, या उद्देशाने आम्ही शाश्वत, मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी सक्षम अशी संस्था विकसित करीत आहोत." - विलास शिंदे (व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स)

"इंकोफिनला गुंतवणूकदार संघाचे आणि सह्याद्री फार्म्स सोबत भागीदारी विकसित करण्यासाठीचे नेतृत्त्व करताना अभिमान वाटतो. भागीदारी आधारित दृष्टिकोनातून विकसित झालेल्या सह्याद्रीच्या संकल्पनेचा कृषी क्षेत्रात वैश्विक ‘रोल मॉडेल' म्हणून प्रसार व्हावा, ज्यातून शाश्वत आर्थिक परिणाम, हवामान बदलासाठी अनुकूलन आणि ग्रामीण समुदायात सर्वसमावेषक विकास साध्य करताना शेती क्षेत्र तंत्रज्ञान आधारित आणि जागतिक स्पर्धाक्षम व्यवसाय होईल. "

- राहुल राय (इंकोफिन इंडिया)

"भारतातील छोट्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सह्याद्री फार्म्सच्या रुपाने दीर्घकालीन भागीदार मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. शेतकऱ्‍यांना त्यांचा व्यवसाय भरभराटीस आणण्यासाठी कोणती मदत आवश्यक आहे, हे ओळखून ती मदत करण्याच्या सह्याद्रीच्या क्षमतेने आम्ही प्रभावित झालो. भारतातील शेतकऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या एका संस्थेमध्ये झालेली ही पहिली आंतरराष्ट्रीय भांडवली गुंतवणूक आहे. सह्याद्रीला आणखी शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास आणि कृषी उद्योगाच्या पुढील वाढीसाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार करण्यात नक्कीच उपयुक्त ठरेल."

- मायकेल जोन्गेनील (मुख्य कार्यकारी अधिकारी, एफएमओ)

Sahyadri Farms Logo
नांदूरमधमेश्‍वर'मधील Typha निर्मूलनाचे काम पक्ष्यांच्या विणीच्या हंगामात!

"सह्याद्री फार्म्सचा इंकोफिन, कोरीस आणि एफएमओ यांच्याप्रमाणे भागधारक बनल्याचा ‘प्रोपार्को’ला अभिमान आहे. ही गुंतवणूक अभिनंदनीय आहे. जबाबदार दृष्टीकोनासाठी वचनबद्ध असलेल्या या गुंतवणुकीमुळे अनेक सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणपूरक परिणाम होणार आहेत. सुरुवातीला जवळपास १५ हजार शेतकरी आधुनिक पुरवठा साखळीत प्रवेश करण्यासाठी सक्षम होतील. शेतकऱ्यांना उत्पादने आणि त्यांची गुणवत्ता वाढवता येईल. शेतीचे नुकसान कमी होऊन आणि कीटकनाशके आणि खतांचा वापर कमी होईल. हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठीच्या ठोस उपाययोजना राबविण्यासाठी सह्याद्री या गुंतवणुकीमुळे सक्षम होईल. अक्षय ऊर्जा उत्पादनातील आपला हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक वाढवून शेवटी शून्य कचरा धोरणाची अंमलबजावणी शक्य होईल. "

- फ्रँकोइस लोम्बार्ड (मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रोपार्को)

"सह्याद्री फार्म्सचे भागीदार होताना आम्हाला आनंद होत आहे. कारण हे असे शाश्वत मॉडेल आहे की, ज्यात शेतकरी समुदाय आणि पर्यावरणविषयक जागरुकता यावर भर दिला आहे. सह्याद्रीची वाटचाल शेतकरी ते उद्योजक बनण्याच्या एका प्रेरक कहाणीत गुंफलेली आहे. ज्यांनी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करुन पारंपरिक भारतीय शेतीचे रूपांतर करण्याचा दृष्टीकोन अंगीकारला आहे. सह्याद्रीचे संस्थापक आणि ‘मॅनेजमेंट टीम' प्रगत डिजीटल सोल्यूशन, व्यावसायिक वैविधतेने परिपूर्ण अशा परिपूर्ण कृषी मूल्यसाखळीत पारदर्शकता आणण्यात आणि मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या नेतत्वाखालील शेतकऱ्यांची कंपनी म्हणून विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे." - हरी सुब्रमण्यम (कोरीस, इंडिया)

Sahyadri Farms Logo
Political News : माजी आमदारांसह जुने शिवसैनिक शिंदे गटात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()