Nashik Officers Retirement : सहाय्यक आयुक्तांसह 32 अधिकारी- कर्मचारी निवृत्त

Nashik Officers Retirement
Nashik Officers Retirementesakal
Updated on

Nashik Officers Retirement : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सीताराम गायकवाड यांच्यासह निरीक्षक, उपनिरीक्षकांसह सहाय्यक उपनिरीक्षक, हवालदार असे ३२ अधिकारी- कर्मचाऱ्यांची बुधवारी (ता. ३१) निवृत्ती झाली.

यानिमित्ताने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते निवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. (32 Officers including Assistant Commissioner retired nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Officers Retirement
SAKAL Impact: ‘त्या’ मुलींच्या हस्ते अभ्यासिका फर्निचर कामास प्रारंभ! महापालिकेकडून 17 लाखाचा निधी मंजूर

आयुक्तालयाच्या प्रांगणात निवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. सहाय्यक आयुक्त सीताराम गायकवाड, पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे, उपनिरीक्षक वसंत पगार, लक्ष्मण भामरे, संजय कुलकर्णी, कैलास सोनवणे, विजय खैराते, विजय शिरसाट, युवराज पाटील,

यादव वाघ, रतिलाल इशी, उत्तम पवार, सहायक उपनिरीक्षक भास्कर कडाळे, गेणू मांडे, त्र्यंबक गायकवाड, सुखदेव मगर, चंद्रकांत ठाकरे, संजय पवार, लक्ष्मण बोराडे, अरुण शिर्के, भगवान जाधव, राजाराम वाघ,

दौलत पालदे, ज्ञानेश्वर काकड, हवालदार रामदास जाधव, संपत लोहकरे, रावसाहेब वाघ, प्रदीप शिवरामे, ताई पगार, गोवर्धन गौतम, गणपत शेळके, शिवाजी शेवाळे हे सेवानिवृत्त झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यालयाचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले. सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक रवी मगर यांनी केले. प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी आभार मानले.

Nashik Officers Retirement
BJP Women State Executive: भाजप महिला प्रदेश कार्यकारिणीत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.