Nashik News : लोक अदालतीत 329 दावे निकाली; 3 कोटी 24 लाखांचा महसूल प्राप्त

Legal experts and citizens involved in Lok Adalat
Legal experts and citizens involved in Lok Adalatesakal
Updated on

Nashik News : नाशिक रोड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित आणि दाखलपूर्व वर्गवारीतील ठेवण्यात आलेल्या चार हजार ७६५ प्रकरणांपैकी ३२९ प्रकरणे तडजोडीअंती रविवारी (ता. ३०) निकाली काढण्यात यंत्रणेला यश मिळाले.

निकाली निघालेल्या दाव्यांतून ३ कोटी २४ लाख ७० हजार ६६४ रुपये इतका महसूल मिळालेला आहे. (329 claims settled in Lok Adalat 3 Crore 24 Lakhs revenue received Nashik News)

नाशिक रोड दिवाणी व फौजदारी तसेच मोटार वाहन न्यायालय, विधी प्राधिकरण नाशिक, नाशिक रोड वकील संघातर्फे नाशिकरोड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

यात पॅनल क्रमांक १ मध्ये न्या. शर्वरी एस. जोशी, पॅनल मेंबर अ‍ॅड. अविनाश भोसले, पॅनल क्रमांक २ मध्ये न्या. ए. एन. सरक, पॅनल मेंबर अ‍ॅड. प्रतीक मालपाणी यांनी कामकाज पाहिले. यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात एकूण तीन हजार ८२७ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

त्यापैकी १८१ प्रकरणे निकाली निघून ३ कोटी ११ लाख ६८ हजार ९७७ रुपये इतका महसूल प्राप्त झाला. तर मोटार वाहन न्यायालयातील ८२३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १४१ प्रकरणे निकाली निघून ७ लाख २३ हजार ६०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Legal experts and citizens involved in Lok Adalat
Unseasonal Rain : बागलाण तालुक्यात अवकाळीचा पुन्हा धुडगूस; ढगफुटी सदृश पावसाने जनजीवन विस्कळित

तसेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट कलम १३८ अन्वये ११५ प्रकरणांपैकी ७ प्रकरणे निकाली निघून ५ लाख ७८ हजार ८७ रुपये महसूल प्राप्त झाला.

या राष्ट्रीय लोक अदालतीच्या कामकाजासाठी नाशिक रोड वकील संघाचे अ‍ॅड. सुनील शितोळे, अ‍ॅड. उमेश साठे, अ‍ॅड. मनीषा बेदरकर, अ‍ॅड. प्रमोद कासार, अ‍ॅड. गणेश मानकर, अ‍ॅड. आनंद भोसले, अ‍ॅड. प्रिया बावीस्कर, अ‍ॅड. कुलदीप यादव, अ‍ॅड. एकता आहुजा, सहाय्यक अधीक्षक डी. आर. वैद्य, ए. एन. बागूल, मनोज मंडाले, रणशेवरे व इतर कर्मचारी तसेच शहर वाहतूक पोलिस आदींचे न्याय यंत्रणेला सहकार्य लाभले.

Legal experts and citizens involved in Lok Adalat
Nashik: सुट्ट्यांमुळे रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी! सुट्यांमुळे नाशिक रोडला फुकट्या प्रवाशांवर रेल्वेची मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.