Nashik : RTE च्‍या ३३ टक्‍के जागा रिक्‍तच

Right to Education
Right to Educationesakal
Updated on

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमध्ये (Private Schools) राखीव स्‍वरुपातील २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची (Free Admissions) प्रक्रिया सध्या सुरु आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या या प्रक्रियेअंतर्गत दोनवेळा मुदतवाढ देऊनही जिल्‍हास्‍तरावर ३३ टक्‍के जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत. जिल्‍हास्‍तरावर उपलब्‍ध असलेल्‍या चार हजार ९२७ जागांपैकी मंगळवार (ता.१०) पर्यंत तीन हजार २७२ जागांवर प्रवेश झालेले असून एक हजार ६५५ जागा अद्यापही रिक्‍त आहेत. या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध होणार आहे. (33% of RTE seats are vacant Nashik Education News)

यावर्षी आरटीईअंतर्गत पंचवीस टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया वेळेवर सुरु झाल्‍याने समाधान व्‍यक्‍त केले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील ४२२ शाळांनी प्रक्रियेत सहभाग नोंदविला होता. या शाळांमध्ये प्रवेशासाठी चार हजार ९२७ जागा उपलब्‍ध होत्‍या. या जागांकरिता तब्‍बल सोळा हजार ५६७ अर्ज ऑनलाइन (Online Application) स्वरूपात प्राप्त झाले होते. राज्‍यस्‍तरीय सोडतीत चार हजार ५१३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती. नियमित मुदतीत प्रवेशाला फारसा प्रतिसाद मिळाल्‍यानंतर मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. दोन वेळा मुदतवाढ दिल्‍यानंतर मंगळवार अखेरीस तीन हजार ३७२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झालेले आहेत. तरीदेखील एक हजार ६५५ जागा रिक्‍त आहेत.

Right to Education
Nashik : ट्रकसह 24 लाखांचा अवैद्य मद्यसाठा जप्त

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना सूचनेची प्रतीक्षा

मंगळवारी नियमित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सायंकाळी उशिरापर्यंत मुदतवाढ दिलेली नव्‍हती. अशात आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्‍या प्रवेशाचा मार्ग मोकळा झालेला आहे. परंतु अशा विद्यार्थ्यांच्‍या प्रवेशासंदर्भातील वेळापत्रक किंवा अन्‍य तपशील सायंकाळी उशिरापर्यंत जारी केलेला नव्‍हता. येत्‍या दोन-तीन दिवसात ही माहिती पोर्टलवर उपलब्‍ध करून दिली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रतीक्षा कायम होती.

Right to Education
सह्याद्री संवाद - ‘क्रिकेटने मला काय शिकविले?‘

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.