Nashik Unseasonal Rain Damage: 33 हजार हेक्टरला अवकाळीचा तडाखा; सर्वाधिक फटका द्राक्ष पंढरीला

33 thousand hectares were affected by unseasonal rain nashik news
33 thousand hectares were affected by unseasonal rain nashik newssakal
Updated on

Nashik Unseasonal Rain Damage : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे ३२ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांना तडाखा बसल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे.

यात सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष पंढरीचे झाले असून, ११ हजार ५९७ हेक्टर द्राक्षबागा कोलमडल्या आहेत. साडेदहा हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ८९० गावांतील ६७ हजार ८६६ शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे. (33 thousand hectares were affected by unseasonal rain nashik news)

जिल्ह्यात रविवारी (ता. २७) दुपारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने सोमवारी (ता. २८) दुपारपर्यंत झोडपले. सोसाट्याचा वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने द्राक्ष, कांदा, टोमॅटो यांसह ऊस व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्षबागांमध्ये गारांचा ढीग साचल्याचे दिसून आले. कृषी विभागाने या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला असून, ३२ हजार ८३२ हेक्टरवरील जिरायत, बागायत क्षेत्रासह बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले.

यात इगतपुरी (१२२), कळवण (११८), निफाड (१०२), दिंडोरी (९८), नाशिक (८९), नांदगाव (८८), बागलाण (७६), सुरगाणा (७१), पेठ (६४), चांदवड (३०), त्र्यंबकेश्वर (२०), सिन्नर (९), येवला (५) अशा १३ तालुक्यांतील एकूण ८९० गावांत पिकांचे नुकसान झाले. मालेगाव व देवळा तालुक्यांतील पिके काहीअंशी बचावली.

या तालुक्यांतील एकाही गावाचा प्राथमिक अहवालात समावेश नाही. भात (६७२९ हेक्टर), गहू (५७८), टोमॅटो (३१०), भाजीपाला व इतर (१७९५), मका (१६९) व उसाचे (२२१ हेक्टर) नुकसान झाले. ३४ हेक्टरवरील डाळिंब बागांनाही फटका बसल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

33 thousand hectares were affected by unseasonal rain nashik news
Unseasonal Rain Damage : साहेब, अवकाळीमुळे होत्याचे नव्हते झाले; शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

दहा हजार हेक्टर कांद्याचे नुकसान

काढणीवर आलेल्या दहा हजार ४०८ हेक्टरवरील नवीन लाल कांद्याचे या पावसामुळे नुकसान झाले. ४६७ हेक्टरवरील कांदा रोपे पाण्यात गेल्याने उन्हाळ कांद्याची लागवड अडचणीत येणार आहे. जिरायत क्षेत्रातील ४८८ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले. जिरायत व बागायत क्षेत्राचा विचार केल्यास सुमारे दोन हजार २०० हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

निफाडला सर्वाधिक फटका

अवकाळीचा सर्वाधिक फटका निफाड तालुक्याला बसला आहे. येथील नऊ हजार २९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बागलाण तालुक्यात (५७० हेक्टर), नांदगाव (३२५३), कळवण (७७३), दिंडोरी (२९६४), सुरगाणा (२२५), नाशिक (८६८), त्र्यंबकेश्वर (२२८), पेठ (५५६), इगतपुरी (५९२०), सिन्नर (३७), चांदवड (७५७७) आणि येवला तालुक्यात (५६५) नुकसान झाले.

33 thousand hectares were affected by unseasonal rain nashik news
Nashik Unseasonal Rain Damage : अकराशे कोटींच्या शेतमालावर जिल्ह्यात 8 दिवसांत पाणी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()