Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगीदेवीच्या चरणी 35 हजार भाविक लीन; लेझर शोमुळे गडाच्या सौंदर्यात भर

Nashik Divisional Revenue Commissioners Radhakrishna Game, Kritika Jamdar, Saroj Waghwase etc. died on Tuesday, the third day of Navratri festival.
Nashik Divisional Revenue Commissioners Radhakrishna Game, Kritika Jamdar, Saroj Waghwase etc. died on Tuesday, the third day of Navratri festival.esakal
Updated on

Saptashrungi Devi Gad : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेस मंगळवारी (ता. १७) आदिशक्ती सप्तशृंगीमातेस हिरव्या रंगाचे महावस्त्र नेसवून साजशृंगार करण्यात आला होता. मंगळवारी सुमारे ३० ते ३५ हजार भाविकांनी सप्तशृंग गडावर आई सप्तशृंगीचे दर्शन घेतले.
सप्तशृंगीदेवीच्या तिसऱ्या शक्तीचे नाव चंद्रघंटा आहे.

देवी चंद्रघंटाचे रूप परम शांतीपूर्ण आणि परोपकारी आहे. देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. देवी चंद्रघंटाची पूजा-अर्चा केल्याने आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते, असे मानले जाते. (35 thousand devotees worship at feet of Saptashrungi Devi on third day nashik news)

धार्मिक शास्त्रानुसार चंद्रघंटाची पूजा करतो, त्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. धर्मग्रंथानुसार देवी चंद्रघंटाने राक्षसांना मारण्यासाठी अवतार घेतला होता.

यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या शक्तींचा समावेश होतो. त्यानुसार साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे आद्यस्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवातील तिसऱ्या माळेची महापूजा नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कृतिका जामदार, सरोज वाघवसे यांनी केली. मंगळवार देवीचा वार समजला जात असल्याने भाविकांंची गर्दी अधिक होती. महिला भाविकांनी मंदिर व परिसरात सप्तशतीचे पठण करीत असल्याचे दिसले.

दुपारनंतर भाविकांची गर्दी वाढली होती. आई सप्तशृंगीचा जयघोष करत भाविक मोठ्या उत्साहात न थकता मंदिराच्या पायऱ्या सहजतेने चढून जात होते.

Nashik Divisional Revenue Commissioners Radhakrishna Game, Kritika Jamdar, Saroj Waghwase etc. died on Tuesday, the third day of Navratri festival.
Navratri Diet Tips : उपवास केलाय म्हणून उपाशी राहू नका, नाहीतर दहाव्या दिवशी दवाखाना मागे लागेल!

आई सप्तशृंगीचे तेजोमय स्वरूप व गाभाऱ्याची सजावट पाहण्याची ओढ भाविकांमध्ये दिसून येत होती. मंदिरात गेल्यानंतर आई सप्तशृंगीचे मनमोहक स्वरूप पाहून भाविकांनी श्री भगवतीला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी साकडे घातले.

लेझर शोमुळे गडाच्या सौंदर्यात भर

सप्तशृंग गडावर सध्या नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे. आकर्षक रोषणाईने गड उजळून निघाला आहे. श्री सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्टच्या सहकार्याने गडावर विशेष लेझर रोषणाई करण्यात आली आहे.

लेझरच्या माध्यमातून विशालकाय सप्तशृंग गडावर आदिमायेची छबी, तसेच आई सप्तशृंग नाव साकारले आहे. रात्री मनमोहक दृश्य भाविकांच्या उत्साहात आणखी भर घालत आहे. कोजिगिरी पौर्णिमेला लेझर शो करण्यात येणार आहे. लेझर शोमुळे रात्री गडाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

Nashik Divisional Revenue Commissioners Radhakrishna Game, Kritika Jamdar, Saroj Waghwase etc. died on Tuesday, the third day of Navratri festival.
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगीदेवी मंदिराच्या गाभाऱ्यास चांदीतील नक्षीकामाचा नवा साज; 465 किलो चांदीचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.