Nashik: 36 कोटींचे कामे पुरवणी अर्थसंकल्पात; भुजबळांच्या प्रयत्नांतून मतदारसंघातील कामे मार्गी लागणार

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

Nashik News : मतदारसंघातील ३६ कोटी ४४ लक्ष २३ हजार रुपयांच्या रस्ते,पुलांच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे येवला मतदार संघातील रस्त्यांना आणि पुलांची अनेक कामे मार्गी लागणार असून नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. (36 crore works in supplementary budget efforts of Bhujbal works in constituency will be cleared Nashik)

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून हा निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मतदार संघातील विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

मतदारसंघात गेल्या काळात काही रस्त्यांची व पुलांची दुरवस्था झाल्याने या रस्त्यांची व पुलांची सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी त्यांनी पुरवणी अर्थसंकल्पात केली होती.

तालुक्यातील अनकाई-कुसमाडी-नगरसूल-अंदरसूल ते पिंपळगाव जलाल रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लाख, वापी- पेठ - नाशिक - निफाड- येवला- वैजापूर- औरंगाबाद- जालना रस्ता प्रमुख राज्य मार्ग २ या रस्त्यासाठी २ कोटी ९० लक्ष,

येवला- नागडे- धामणगाव- धामोडे- बिलोनी ते ७५२ जी रस्त्यावर मध्ये संरक्षण भिंत बांधण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष, अहमदनगर जिल्हा हद्द पढेगाव- अंदरसूल- न्याहारखेडा- रेंडाळे- ममदापूर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ७७ रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी १ कोटी ८० लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chhagan Bhujbal
MGNREGA News: फळबाग लागवडीत फळांचा राजाच अव्वल! जिल्ह्यात 2 हजार 64 हेक्टरवर लागवड

तालुक्यातील विखरणी- कानडी - पाटोदा- दहेगाव- जऊळके - मुखेड फाटा- सत्येगाव ते धामोरी प्रमुख जिल्हा मार्ग १९५ रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष, गोपाळवाडी- अनकुटे धामोडे राज्य महामार्ग २५ ते मातुलठाण- सायगाव- अंगुलगाव ते प्रमुख जिल्हा मार्ग ७८ प्रमुख जिल्हा मार्ग १५९ रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ कोटी येवला-पारेगाव - निमगावमढ-महालखेडा- भिंगारे- पुरणगाव ते प्रमुख राज्य मार्ग २ रस्ता रुंदीकरण करण्यासह मजबुतीकरण करण्यासाठी २ कोटी, पाटोदा- सातारे- एरंडगाव- रवंदा प्रमुख जिल्हा मार्ग १७८ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष, मनमाड- इकवाई-

मोहेगाव- भालूर- लोहशिंगवे- राजापूर- ममदापूर- खरवंडी- कोळम- भारम रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ७६ या रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख, अनकाई - नायगव्हाण- पिंपळखुटे- राजापूर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ७० वर पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ४६ लाख ७५ हजार तर अनकुटे मातुलठाण तळवाडे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १५९ वर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी १४ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव पाटोदा रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी ४ कोटी, पाचोरे मऱ्हळगोई विंचूर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ९० लाख, देवगाव ते देवगाव फाटा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १२६ वर स्लॅबड्रेनचे बांधकाम करण्यासाठी ९० लाख, ब्राम्हणगाव वनस ते वनसगाव एमडीआर -१७५ वर मोठा पूल बांधण्यासाठी ३ कोटी ८२ लाख रूपयांच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पामध्ये समावेश झाला आहे.

मंडल अधिकारी कार्यालसाठी ४५ लाख मतदारसंघातील लासलगाव, विंचूर व देवगाव येथील मंडल अधिकारी कार्यालय व निवासस्थान बांधकाम करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पातून ४५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

Chhagan Bhujbal
Nashik Police Bike Squad: नागरिकांच्या मदतीसाठी ग्रामीण पोलिसांचे 27 दुचाकींचे पथक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.