Nashik : ‘त्या‘ 36 मनसे पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

office bearers with Raj Thackeray
office bearers with Raj Thackerayesakal
Updated on

नाशिक : मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या आदेशाचे पालन करणाऱ्या ३६ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १६) राज यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या वेळी सर्वांच्याच पाठीवर शाबासकीची थाप देत ठाकरे यांनी पाठीशी उभे राहण्याचे आश्‍वासन देताना कायदेशीर पद्धतीने आंदोलन करण्यासाठी लवकरच रूपरेषा ठरविणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर संघटना बांधणीचे संकेत देताना जून महिन्यात दौरा निश्‍चित केला. (36 MNS office bearers appreciation from Raj Thackeray over bhonga incident Nashik News)

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या विरोधात आंदोलन (Bhonga Incident) करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर नाशिकच्या बालेकिल्ल्यात कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी जोरदार तयारी केली. ज्या भागात मशिदीचे भोंगे वाजतील, तेथे हनुमान चालिसा लावण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने तयारी झाली, परंतु पोलिसांनी आदल्या दिवसापासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याने आंदोलनाला हवे तसे बळ मिळाले नाही. जुने नाशिकमध्ये आंदोलन झाले, परंतु आंदोलन पूर्णत्वास जाण्यापूर्वीच कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. आंदोलनात ३६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात सहा महिला पदाधिकाऱ्यांचादेखील समावेश होता. न्यायालयाने सर्वांना पंधरा दिवस हद्दपार करण्याच्या सूचना दिल्या.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयीन लढाई लढल्यानंतर हद्दपारी मागे घेण्यात आली. गुन्हे दाखल झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत निवासस्थानी राज ठाकरे यांनी बोलावून घेत सर्वच पदाधिकाऱ्‍यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पक्षाचा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी एकजूट दाखवल्याने कौतुक केले. मशिदीवरील भोंग्याविरोधात नव्याने कायदेशीर लढाई लढली जाणार असून, त्याची रूपरेषा लवकरच जाहीर करणार असल्याचे या वेळी कार्यकर्त्यांना सांगितले. या वेळी शहर समन्वयक सचिन भोसले यांनी आंदोलनाचा अहवाल सादर केला.

office bearers with Raj Thackeray
नाशिक : पत्नीच्या हत्येनंतर पतीची आत्महत्या

शहराध्यक्ष दिलीप दातीर (Dilip Datir), जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, जिल्हा संघटक सुरेश घुगे, शहर प्रवक्ते पराग शिंत्रे, प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर, चित्रपट सेनेचे जिल्हाध्यक्ष निखिल सरपोतदार, शहर उपाध्यक्ष किरण क्षीरसगार, शहर संघटक विजय ठाकरे, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, महिला पदाधिकारी सुजाता डेरे, कामिनी दोंदे, अक्षरा घोडके, अरुणा पाटील, सचिन सिन्हा, भाऊसाहेब निमसे, संदीप भवर आदी उपस्थित होते.

office bearers with Raj Thackeray
Nashik : आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकांची पसंती बालाजीला

पदाधिकाऱ्यांना हुरूप, अमित ठाकरे येणार

राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केल्याने कार्यकर्त्यांमध्ये हुरुप निर्माण झाला. तसेच, जून महिन्यात अमित ठाकरे पक्ष संघटना बळकटीसाठी येणार असून, वेळी काही बदल करण्याचे संकेत त्यांनी दिल्याचे माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.