Nashik ZP News: सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा 37 टक्के निकाल; 158 पैकी केवळ 58 कर्मचारी उत्तीर्ण

mpsc exam
mpsc examesakal
Updated on

Nashik ZP News : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने २५ व २६ फेब्रुवारी २०२३ ला घेण्यात आलेल्या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा निकाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अधिसूचनेद्वारे घोषित करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचारी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यापैकी ५८ कर्मचारी उत्तीर्ण झाले असून, परीक्षेचा निकाल ३७ टक्के लागला आहे. (37 percent result of post service entrance exam Out of 158 only 58 employees passed Nashik ZP News)

फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सामान्य प्रशासन, महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ व इतर जिल्हा परिषद नियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम व शिस्त व अपील नियम, जिल्हा परिषदेकडील योजना या तीन विषयांची लेखी परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयात ४० गुण मिळवणे आवश्यक आहे. याप्रमाणे ५८ कर्मचारी हे परीक्षा उत्तीर्ण झाले. जिल्हा परिषद कर्मचारी सेवेत दाखल झाल्यानंतर चार वर्षांत तीन संधीमध्ये सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

विहित मुदतीत सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सदर कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता व वेतनवाढी उत्तीर्ण होईपर्यंत रोखल्या जातात. त्यामुळे सदर परीक्षा उत्तीर्ण होणे कर्मचाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असते.

mpsc exam
Jalgaon ZP News : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांकात 20 टक्क्यांनी वाढ

सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील वेतनवाढ, स्थायित्व प्रमाणपत्र व पदोन्नतीचे लाभ दिले जातात.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबत आदेश निर्गमित केले असून, सदर परीक्षेचा निकाल सर्व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देणेबाबत व उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात ३१ ऑक्टोबर २०२३ या बाबतची नोंद घेण्याचे आदेशित केले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

mpsc exam
Nashik ZP School : जिल्हा परिषद शाळेला कोणी शिक्षक देता का... विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.