NMC News: शहरात 37 हजार पाणी मीटर बंद! दिवाळीनंतर महापालिका करणार तपासणी

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

NMC News : पाण्याची गळती तसेच पाण्याच्या थेंब अन्‌ थेंबाचा हिशोब घेण्यासाठी महापालिकेने अनधिकृत नळजोडणीधारकांना जोडण्या अधिकृत करण्यासाठी अमलात आणलेल्या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याने थेट कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

या वेळी करण्यात आलेल्या पाहणीत तब्बल ३७ हजार १४५ पाणी मीटर बंद असल्याची बाब समोर आली. त्यामुळे दिवाळीनंतर आता मीटर बंद असले तरी तेथे पाणीपुरवठा सुरू आहे का, सुरू असेल तर कोठून याची तपासणी पाणीपुरवठा विभागाकडून सुरू केली जाणार आहे. (37 thousand water meters closed in city NMC will conduct inspection after Diwali nashik)

महापालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो. परंतु ज्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो. त्या प्रमाणात वसुली होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती असल्याचा संशय आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा योजनेवर होणारा खर्चदेखील देयकांमधून मिळत नाही.

त्यामुळे महापालिकेकडून हिशोब बाह्य पाणी शोधण्यांबरोबरच अनधिकृत नळजोडण्या शोधण्यासाठी अभय योजना जाहीर केली. १ मेपासून ही योजना लागू झाली. शहरात एकूण पावणेपाच लाख मिळकती असून त्यापैकी अवघे दोन लाख नळ कनेक्शन आहे.

यात जवळपास २५ हजाराहून अधिक नळजोडण्या अनधिकृत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अभय योजना अमलात आणली गेली, परंतु अभय योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून थकबाकीदारांकडून वसुलीसाठी यादी काढली गेली.

त्यानुसार सर्वेक्षण केले असता, ३७ हजार १४५ पाण्याचे मीटर बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे पाणी मीटर बंद का आहे, बंद असेल तर पाणीपुरवठा कोठून होतो, याचा तपास करण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे.

"थकबाकीच्या माध्यमातून तपासणी केल्यानंतर ३७ हजारांहून अधिक अनधिकृत पाणी मीटर बंद असल्याचे आढळले. त्यामुळे आता क्रॉस व्हेरीफिकेशन करून पाणीपुरवठ्याची माहिती घेतली जाणार आहे."- श्रीकांत पवार, उपायुक्त, कर विभाग.

NMC Nashik News
Nashik News: शहरातील धर्मशाळांचे बदलले रूपडे! पथारी ते अत्याधुनिक सुविधा; जुनी धर्मशाळा वातानुकूलित

विभागनिहाय बंद असलेले पाणी मीटर

विभाग बंद मीटर संख्या

पूर्व ८०६४

नाशिकरोड ४५९६

पश्चिम ४६७५

सिडको ११,०१६

पंचवटी ४,४६४

सातपूर ४,३३०

-----------------------------------

एकूण ३७,१४५

अनधिकृत नळजोडणीवर असा होईल दंड (रुपये)

नळजोडणी आकार घरगुती बिगर घरगुती व्यावसायिक

१५ मी.मी. ५४०० १९,८०० २४,३००

२० मी.मी. ९,९०० ४७,५२० ५३,४६०

२५ मी.मी. २१,६०० १,१८,८०० १,१६,६४०

४० मी.मी. ६३,००० ३,१६,८०० ३,४७,२००

५० मी.मी. १,१५,२०० ७,९२,००० ६,२२,०८०

NMC Nashik News
NMC News: अतिक्रमण मोहिमेतील जप्त साहित्याचा लिलाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()