Gram panchayat Election : भरपावसात 6 तासात 58.74 टक्के मतदान

Gram Panchayat Election
Gram Panchayat Electionesakal
Updated on

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान सुरु झाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुसळधार पाउस सुरु आहे. अशा पावसातही आज तीन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान सुरु होते. पहिल्या सहा तासात ८५ हजार २२४ म्हणजे (५८.७४) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (59 percent voting in 6 hours in heavy rain Gram panchayat election Nashik Latest Marathi News)

नाशिक जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतीमध्ये २८४ मतदान केंद्रावर सरपंच पदासाठी थेट मतदान आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यात ८२ ग्रामपंचायतीसाठी २८४ मतदान केंद्रावर मतदान सुरु आहे. त्यात ६९ हजार ९४२ महिला आणि ७५ हजार १४४ पुरुष याप्रमाणे १ लाख ४५ हजार ८७ ग्रामस्थ त्यांच्या गावचे कारभारी निवडणार आहे.

जिल्ह्यातील नाशिक (१६),कळवण (२२) आणि दिंडोरी (५०) यापैकी ८२ ग्रामपंचायतचा समावेश आहे. या तीन तालुक्यांमध्ये नाशिक, कळवण, दिंडोरी यांचा समावेश आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून मात्र तरीही मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Gram Panchayat Election
ऐन पावसाळ्यात शिवशाहीची मनमानी; Reservation असूनही दीड ते दोन तासाचा उशीर

चार तासात ३८ टक्के

जिल्ह्यातील तीन तालुक्यांत मतदानासाठी भरपावसात धावाधाव सुरु होती. सगळीकडे सकाळीच मतदानाला सुरुवात झाली. भरपावसात मतदानासाठी गावोगाव उत्साह आहे. सरपंचासाठी थेट ग्रामस्थांमधून निवड होणार असल्याने उत्साह आहे.

सकाळी साडे सातला मतदानाला सुरुवात झाली. ठिकठिकाणी पाउस असुनही साडे अकरापर्यत २५४०१ महिला आणि ३०६४४ पुरुष याप्रमाणे ५६०४५ (३८.६३ टक्के ) मतदारांनी भरपावसाता त्यांच्या गावाचा कारभारी निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला.

Gram Panchayat Election
चालक दिन विशेष : लेकींना हवाई सुंदरी बनविण्यासाठी रिक्षाचालक आईची पराकाष्ठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()