Jal Jeevan Mission : आदिवासी भागातील 38 विहिरी कोरड्या; नवीन विहीर खोदण्याची नामुष्की

38 wells in tribal areas dry nashik news
38 wells in tribal areas dry nashik newsesakal
Updated on

Jal Jeevan Mission : घरोघरी नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील ६०४ विहिरींची पातळी तपासली असता आदिवासी भागातील ३८ विहिरी कोरड्या आढळल्या आहेत. १२ विहिरींना पुरेसे पाणी न आढळल्याने येथील पाणीपुरवठा योजनांसाठी नव्याने विहीर खोदण्याची वेळ आली.

उद्‍भव चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या विहिरींपैकी सर्वाधिक विहिरी या प्रामुख्याने सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमधील आहेत. सुरगाण्यात ११ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात १० विहिरी उद्‍भव चाचणीत अनुत्तीर्ण झाल्या आहेत. (38 wells in tribal areas dry nashik news)

नाशिक जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार केल्यास पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस होत असला, तरी तेथील कठीण खडकामुळे भूगर्भात भूजलसाठा होत नाही. यामुळे या भागात प्रत्येक उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतो.

जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एक हजार ४१० कोटींच्या एक हजार २२२ योजनांना मंजुरी दिली. त्यातील ६०४ योजनांच्या विहिरींची कामे एप्रिलपर्यंत पूर्णही झाली आहेत.

या ६०४ विहिरींच्या उद्‍भवाची चाचणी मे व जूनमध्ये करण्यात आली. यात ५० विहिरींना गरजेपेक्षा कमी उद्‍भव असल्याचे आढळून आले. यामुळे या सर्व ५० ठिकाणी नवीन उद्‍भव विहिरींना मंजुरी दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

38 wells in tribal areas dry nashik news
Nashik Lumpy Disease : जिल्ह्यात 6 जनावरांना लम्पीची लागण; 2 जनावरे दगावली

पाणीपुरवठा योजनेत एका विहिरीला तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार साधारणपणे साडेतीन ते सात लाख रुपये खर्च येतो. उद्‍भव तपासणीत ती विहीर उत्तीर्ण झाल्यावर विहिरीच्या कठड्यांचे बांधकाम केले जाते. यामुळे एका योजनेवरील विहिरीस साधारणपणे दहा लाख रुपये खर्च येत असतो.

सिन्नर, येवल्यात विहिरींना पुरेसे पाणी

सिन्नर व येवला हे कायमस्वरूपी दुष्काळी तालुके आहेत. या तालुक्यांमधील विहिरींच्या उद्‍भवाची चाचणी घेतली असता तेथे सर्व विहिरींना पुरेसे पाणी असल्याचे आढळून आल्यास भूजल शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालात नमूद आहे. या तालुक्यांमध्ये पाणी योजना असलेल्या गावांमध्येही उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या अधिक असते. यामुळे या उद्‍भव चाचणीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

उद्‍भव चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या विहिरी

कळवण (५), मालेगाव (५), सटाणा (२), नांदगाव (२), त्र्यंबकेश्वर (१०), दिंडोरी (६), निफाड (१), पेठ (३), सुरगाणा (११), इगतपुरी (१), देवळा (१), चांदवड (१).

38 wells in tribal areas dry nashik news
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 21 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा थांबवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.