नाशिक : कॉलेज रोड व गंगापूर रोड शिवजन्मोत्सव समितीतर्फे शिवजयंतीचे निमित्त साधून शिवप्रेमींना शिवचरित्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिवजयंती ही नाचून व वाचून साजरी करावी. ही संकल्पना राबविण्यात आली.
कॅनडा कॉर्नर सिग्नल येथे शिवजयंतीनिमित्त भव्य देखावा उभारण्यात आला होता. भगवे ध्वजांनी परिसर सजविण्यात आला.कॉलेज रोड- गंगापूर रोड शिवजन्मोत्सव समितीने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष मच्छिंद्र देशमुख यांनी ३९३ शिवचरित्राचे पुस्तकांचे वाटप केले.
शिवजयंती ही नाचून व वाचून साजरी व्हावी ही संकल्पना या वेळी मांडण्यात आली होती. शिवराय घराघरांत व मनामनात पोचविताना त्यांचे चरित्र वाचून त्यांच्यातले काही गुण आपण आपल्या अंगी बाळगले तर नक्कीच पुन्हा एकदा स्वराज्याची नांदी घडेल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी या वेळी व्यक्त केला. (393 Shivcharitra books distributed to Shiv lovers Grand appearance on Shiv Jayanti at Canada Corner Signal Nashik News)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
तीस फुटाची एलईडी वॉलवर शिव किल्ल्यांची माहिती देण्यात आली. शिवसेना जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, श्रमिक सेना जिल्हाध्यक्ष अजय बागूल, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, भाजपचे लक्ष्मण सावजी, योगेश हिरे, हिमगौरी आडके, विक्रम नागरे, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेशाध्यक्ष शरद आहेर आदींनी शिवजन्मोत्सवात सहभाग नोंदविला. समितीचे कार्याध्यक्ष विनोद नूनसे, सचिव श्रीनिवास कानडे, उपाध्यक्ष आनंद गटकळ यांनी उपक्रम यशस्वी केला.
शिवचरित्राचा उपक्रम स्त्युत्य : डॉ. रनाळकर
‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्राचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी शिवचरित्र वाटप उपक्रमाचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्त्व होते. शालेय शिक्षणातून छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला माहीत आहे.
परंतु त्या व्यतिरिक्त अन्य वाचनातून छत्रपतींना समजता आले पाहिजे. त्यासाठी अन्य साहित्य वाचण्याची नितांत आवश्यकता आहे. गड, किल्ले, इतिहासकालीन शस्त्रे, डावपेच, युद्धकला याचादेखील अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. रनाळकर यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.