Nashik: आंदोलनकर्त्यांचा अन्नत्यागाचा तिसरा दिवस; येवल्यात मराठा आरक्षणप्रश्नी ठिय्या आंदोलनाचा एकतीसावा दिवस

Officials and workers during the visit of the protestors who sacrificed food for Maratha reservation.
Officials and workers during the visit of the protestors who sacrificed food for Maratha reservation.esakal
Updated on

येवला : आरक्षणासह विविध मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजातर्फे तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला ३१ दिवस पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत आता अन्नत्यात आंदोलन सुरू केले आहे.

अन्नत्यागाचा बुधवारी (ता. १८) तिसरा दिवस होता. विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलकांना भेटी देऊन पाठिंबा देत आहेत. (3rd day of protestors fast thirty first day of protest over Maratha reservation question come Nashik)

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत येथील समाजाचे नेते संजय सोमासे, निंबाजी फरताळे, विजय मोरे, गोरख संत, रवींद्र शेळके, जांलिदर मेंढकर, विष्णु चव्हाण आदींनी तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन सुरू केले.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जरांगे-पाटलांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, आश्वासन पूर्ण होउन समाजाला न्याय मिळावा, तसेच स्थानिक प्रश्न सुटावेत, या मागणीसाठी येथे आंदोलन सुरूच आहे. आता आंदोलनकर्त्यांनी अन्नत्याग सुरू केले आहे.

त्यांची प्रकृतीही खालावू लागली आहे. मागील आठवड्यात जरांगे-पाटील यांनी आंदोलनास्थळी भेट देऊन संजय सोमासे यांच्याशी चर्चा केली व २४ ऑक्टोबरपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहू द्या, अशा सूचना जरांगे-पाटील यांनी दिल्या.

Officials and workers during the visit of the protestors who sacrificed food for Maratha reservation.
Maratha Reservation: जरांगेंना भावनिक आवाहन करत मराठा तरुणाची आत्महत्या! सुसाईड नोट व्हायरल

त्यानुसार आता अण्णत्याग आंदोलन सुरू आहे. मागण्यांची दखल घ्यावी, अशी मागणी संजय सोमासे यांनी केली आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन तीव्र केल्याचे श्री. सोमासे यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, विजय वाहुळ, शिवाजी मोरे, आशिष हिरे, नवनाथ वैरळ, रोहिदास पवार, रवरंद्र मेंगाणे, नीलेश भासले, महेश पठारे, विष्णू घुगे, प्रशांत सूर्यवंशी, मनोरमा पाटील,

निर्मला वाघ, संगीता सूर्यवंशी, रेखा पाटील, काजल देवरे, रामदास गायकवाड, सुभाष गायकर, तात्यासाहेब लहरे, अर्जुन जावळे, प्रकाश मोरे, नवनाथ लभडे, प्रल्हाद कवाडे, सचिन साळी, गोरख बोरणारे, विवेक बोरसे, शुभम शिंदे, रतन लभडे, आप्पासाहेब जमदाडे, शिवाजी जमदाडे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला

Officials and workers during the visit of the protestors who sacrificed food for Maratha reservation.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची आत्महत्या; राजकीय वाद पेटण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.