नाशिक : शहरात महापालिका निवडणुकांचे (Municipal Election) वारे वाहू लागले आहेत. त्याच निमीत्ताने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जोरदार शक्तीप्रदर्शन करत निवडणुकीसाठी बिगुल फुंकला. याचा आवाज त्यांच्या विरोधी पक्षांच्या कानी पडला, शॉक मात्र देवेंद्र फडणवीसांनाच बसला. निवडणूकीची वाटचाल सुरू केलेल्या भाजपच्या शिलेदारांनी वाटेतच आपला मार्ग बदलल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणूकीच्या तोंडावर राजकीय चढाचोढ तीव्र
शिवसेनेने नाशिकमध्ये भाजपला राजकीय शॅाक दिला आहे. भाजपचे (BJP) नगरसेवक आज मुंबईत शिवबंधन बांधणार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या सुरूवातीलाच शहरात राजकीय चढाचोढ तीव्र झाली आहे.
एका नगरसेवकाचा शिवसेनेचा प्रवेश अपेक्षित होता, मात्र आता चार नगरसेवकांचा प्रवेश होत असून त्यात भाजपच्या तीन जणांचा समावेष आहे. यामध्ये काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतलेले सय्यद मुशीर यांनी देखील बदलती राजकीय स्थिती लक्षात घेऊन आपला निर्णय बदलला आहे.
भाजपची स्थिती बचावात्मक
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गत पाच वर्षांपूर्वी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि प्रामुख्याने मनसेच्या (MNS) अनेक नगरसेवकांच्या रोज भाजपमध्ये प्रवेशाच्या बातम्या येत होत्या. राज्यात सत्ते असल्याने व पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या सत्ता, राजकीय डावपेच व साधनांचा उपयोग यातून हे घडले होते. त्याच सुमारास जिल्हाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर इडीची (ED) कारवाई झाल्याने भाजपला मोकळं रान मिळाले होते. यंदा परिस्थिती बदलल्याने महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपची सध्या बचावात्मक स्थिती आहे. याची जाणवी असल्याने चार दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवसेनेवर टिकेची झोड उठवली होती. भाजप पुन्हा एकदा महापालिकेत सत्तेत येईल, असा दावा करून प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. प्रत्यक्षात त्यांची पाठ फिरताच नगरसेवकांची चलबिचल लपुन राहिलीे नाही.
शिवसेनेची कंबर कसून तयारी
दरम्यान आज सकाळी नगरसेविका कांडेकर यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा सुपुर्त केला. त्यावर भाजपकडून काहीही प्रतिक्रीया आली नाही. शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीत चांगलीच कंबर कसली आहे. गेले अेक दिवस जोमाने तयारी करीत असताना त्यांनी महानगरप्रमुखपदी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली. त्यांनी शहरात प्रभाग रचनेपासून तर संघटनात्मक तयारीत लक्ष घातले आहे. माजी महापौर वसंत गिते, महानगरप्रमुख बडगुजर, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड यांचे पॅनेल तयार केले होते. त्यात नुकतीच नगरसेवक विलास गिते, माजी महापौर विनायक पांडे यांची भर पडली आहे.
याशिवाय सुनिल बागूल यांना उपनेतेपदी बढती देण्यात आली आहे. ग्राऊंड लेव्हलवर शिवसेनेची ही तयारी व त्यावर संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी त्यात समन्वयकाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे निवडणूक जवळ येईल तशी भाजपची चलबिचल वाढण्याची चिन्हे आहेत. त्याची प्रचिती येऊ लागली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.