नाशिक : महापालिकेच्या पश्चिम विभागाकडून 4 कोटी 36 लाखांची वसुली

नाशिक : थकबाकी वसुलीचा धनादेश स्वीकारताना महापालिका अधिकारी
नाशिक : थकबाकी वसुलीचा धनादेश स्वीकारताना महापालिका अधिकारीesakal
Updated on

जुने नाशिक : महापालिकेकडून एप्रिल महिन्यात थकबाकी भरणाऱ्यांसाठी पाच टक्के सवलत दिली आहे. त्यानिमित्त पश्चिम विभागाने केवळ सत्तावीस दिवसात ४ कोटी ३६ लाख रुपयांची वसुली केल्याची माहिती विभागीय अधिकारी श्री. हरिश्चंद्र यांनी दिली.

रोख रक्कम भरणाऱ्यासाठी पाच टक्के, तर ऑनलाइन भरणाऱ्यांसाठी सहा टक्के सवलत देण्यात येत आहे. बहुतांशी नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम विभागाचा विचार केला तर १ ते २७ एप्रिल अशा केवळ सत्तावीस दिवसात चार कोटी ३६ लाखांची थकबाकी वसूल केले आहे.

नाशिक : थकबाकी वसुलीचा धनादेश स्वीकारताना महापालिका अधिकारी
नाशिक : मालमत्ता धारकांना एप्रिल अखेरपर्यंत 5 टक्‍यांची सूट

त्यात सिटी सेंटर मॉलकडून एका दिवसात १ कोटी ३४ लाखांच्या वसुलीचा समावेश आहे. पश्चिम विभागातील सुमारे ९ हजार ७३ मिळकतधारकांनी सवलतीचा लाभ घेतला आहे. पश्चिम विभागीय अधिकारी श्री. हरिश्चंद्र, महापालिका मुख्यालयातील मनोज संगमनेरे, निरीक्षक देवदत्त शेळके, राजाराम कातडे, श्री. लोणे, श्री. कोतकर यांनी वसुलीसाठी प्रयत्न केले. अन्य थकबाकीदारांनी पाच टक्के सूट सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक : थकबाकी वसुलीचा धनादेश स्वीकारताना महापालिका अधिकारी
नाशिक : 3 दिवसांत संकलित केला 10 टन कचरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.