Nashik Sports Update : नाशिकच्या 4 महिला क्रिकेटपटू वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात!

Maya Sonawane, Eshwari Savkar, Rasika Shinde and Shalmali Kshatriya
Maya Sonawane, Eshwari Savkar, Rasika Shinde and Shalmali Kshatriyaesakal
Updated on

नाशिक : नाशिक क्रिकेटसाठी महिला क्रिकेटमधील आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे, ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व शाल्मली क्षत्रिय या चौघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे गुवहाटी येथे आयोजित वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी या चौघी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. (4 female cricketers from Nashik in Senior Women Maharashtra Cricket Team Nashik Sports Update news)

माया सोनवणे , ईश्वरी सावकार व रसिका शिंदे यांनी यापूर्वी महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ व एकोणीस वर्षांखालील तसेच विविध वयोगटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर शाल्मली क्षत्रिय ने यंदा १९ वर्षांखालील महिला संघाचे प्रतिनिधित्व केले.

माया सोनवणे ही उत्तम फिरकीपटू असून सातत्यपूर्ण कामगिरी च्या जोरावर मायाची लागोपाठ दोन हंगामात प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली होती व काही वर्षांपासून वरिष्ठ महिला संघाची सदस्य आहे.

रसिका शिंदे जलदगती गोलंदाज व उत्कुष्ट फलंदाज असून शाल्मली क्षत्रिय उदयोन्मुख जलदगती गोलंदाज व सलामीवीर आहे. तर ईश्वरी सावकार ची यंदा १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.

महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धे नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ईश्वरी सावकारची कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली आहे व तिच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Maya Sonawane, Eshwari Savkar, Rasika Shinde and Shalmali Kshatriya
Cricket Series : ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानविरुद्ध ODI मालिका खेळण्यास दिला नकार; जाणून तुम्हालाही अभिमानचं वाटेल!

यापूर्वीच्या व यंदाच्या हंगामात वेळोवेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेतील या खेळाडूंची सातत्यपूर्ण, लक्षणीय कामगिरी विचारात घेऊनच सदर निवड झाली आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन मार्फत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे मुली व महिला क्रिकेटपटूंसाठी साठी सराव शिबीर वर्षभर सुरू असते. त्यात सर्व खेळाडूंना उत्तम मार्गदर्शनाचा लाभ होत असतो.

गुवहाटी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय आयोजित , वरिष्ठ महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : १८ जानेवारी - हिमाचल प्रदेश, २१ जानेवारी - विदर्भ , २३ जानेवारी - हैद्राबाद ,२५ जानेवारी - गोवा , २७ जानेवारी - बिहार व २९ जानेवारी - उत्तराखंड .

"या निवडीमुळे नाशिकच्या व खासकरून महिला क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, चौघींच्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , पदाधिकारी , सदस्य व प्रशिक्षक यांनी खास अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत."

- समीर रकटे, सेक्रेटरी, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन.

Maya Sonawane, Eshwari Savkar, Rasika Shinde and Shalmali Kshatriya
Zimbabwe Cricket : झिम्बाब्वे क्रिकेट हादरलं! प्रशिक्षक असलेल्या पती - पत्नीचा महिन्याभरात गूढ मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()