NMC Action on MNGL : खोदाईस एमएनजीएलवर 4 महिन्यांची बंदी! मेअखेरपर्यंत दुरुस्तीच्या कामांच्या सूचना

NMC & MNGL Latest News
NMC & MNGL Latest Newsesakal
Updated on

NMC News : शहरभर रस्ते खोदाई करून सर्वसामान्यांचे जिवन बेहाल करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला अखेर चार महिने रस्ते खोदाईला महापालिकेने बंदी घातली असून, १५ ऑक्टोंबर नंतर कामे करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत.

सध्या सुरू असलेली कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करावीत, असेदेखील सूचनेत म्हटले आहे. (4 months ban on MNGL digging Notice of repair works till end of May NMC nashik News)

घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोचविण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या (एमएनजीएल) कंपनीकडून शहरात पाइप टाकण्यासाठी रस्ते खोदाईची कामे सुरू आहेत. रस्ते खोदाई करण्याच्या बदल्यात एमएनजीएल कंपनीने महापालिकेकडे नियमाप्रमाणे फीदेखील अदा केली आहे.

परंतु, रस्ते खोदाई करताना अटी व शर्तींचे भंग होत आहे. रस्ता मधोमध खोदणे, रस्ता खोदताना विविध प्रकारच्या केबलची मोडतोड, तुटलेल्या केबल दुरुस्त न करणे आदी प्रकार होत आहेत. रस्ते खोदाईमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, अनेक लोक जायबंदी झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आक्रमक पवित्रा घेत कराराचा अभंग करणाऱ्या एमएमजीएल कंपनीच्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कामे तातडीने बंद करण्याची मागणी विभागीय महसूल आयुक्त तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले. याची दखल घेत आयुक्त गमे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन रस्ते करण्यात संदर्भातील अहवाल तातडीने मागविला.

त्याअनुषंगाने एमएनजीएल कंपनीला पुढील चार महिने रस्ते खोदण्यास मनाई केली आहे. १५ ऑक्टोबरला अधिकृत पावसाळा संपल्याची घोषणा होते. त्यानंतरच रस्ते खोदण्याची परवानगी दिली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC & MNGL Latest News
Trimbakeshwar Controversy: 'त्र्यंबकेश्वरच्या कथित घटनेला राजकीय रंग देऊ देणार नाही'

मेअखेरपर्यंत अल्टिमेटम

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून महात्मानगर, पारिजातनगर, श्रीरंगनगर, सप्तशृंगी कॉलनी, प्रमोदनगर, निर्मला कॉलनी, विद्या विकास सर्कल ते विशे चौक रस्ता, सहदेवनगर येथे रस्ता दुरुस्तीचे कामे सुरू आहे.

नाशिक रोड भागात उड्डाणपूल, पूर्व विभागात प्रभाग क्रमांक ३० मध्ये परबनगर, विजय-ममता चौक, ड्रीम सिटी चौक यादरम्यान, तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये सात्विकनगर, प्रभाग क्रमांक २३, प्रभाग क्रमांक २४ मधील तिडकेनगर, नाशिक रोड विभागात एमजी रोड येथे कामे सुरू आहेत. मेअखेर कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

"एमएनजीएल कंपनीने महापालिकेकडे रस्ता तोडफोड ही अदा केली असली तरी अटी व शर्तींचा भंग करून मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे कराराचा भंग झाल्याने कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा."

- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

NMC & MNGL Latest News
Trimbakeshwar: गोमूत्र शिंपडत ‘बम बम भोले'चा गजर अन महाआरती; सर्व पक्षिय बैठकीत शांतता अबाधित राखण्याची सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.