Nashik ZP Super 50 : ‘सुपर ५०’ उपक्रमातील 4 जागा दिव्यांगांना : ‘सीईओ’ आशिमा मित्तल

While felicitating national and international athletes in state level sports conference for the visually impaired
While felicitating national and international athletes in state level sports conference for the visually impairedesakal
Updated on

Nashik ZP Super 50 : जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘सुपर ५०’ या उपक्रमांतर्गत चार जागा या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रथमच दृष्टिबाधितांची क्रीडा परिषद मंगळवारी (ता. २९) सिडकोतील महेश भवनात पार पडली. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक आणि क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड यांच्यातर्फे ही परिषद झाली.

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, ‘नॅब’ युनिटचे माजी अध्यक्ष अशोक बंग, महापालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील, माधव वाघ, ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनचे महासचिव माधव गोरे, ‘नॅब’ महाराष्ट्र क्रीडा समितीचे अध्यक्ष व्ही. एच. पाटील उपस्थित होते. (4 seats in Super 50 program for disabled person nashik news)

कविता राऊत म्हणाल्या, की दिव्यांग खेळाडू व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू. दिव्यांग विद्यार्थी व खेळाडूंना एकत्रित प्रशिक्षणासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगितले. ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन, नाशिकचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी प्रास्ताविक केले.

उद्‌घाटन सोहळ्यानंतर दुपारच्या सत्रात ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज चौधरी यांनी क्रिकेट विषयावर मार्गदर्शन केले. स्वप्नील शाह, चारुदत्त जाधव (बुद्धिबळ), रवींद्र सकपाळ (कबड्डी), जयदीपसिंग (ज्यूदो व कराटे), मनोज कटारिया (सायकलिंग), नेहा पावसकर, सागर बोडके (गिर्यारोहण), अर्जना जोशी (पोहणे व पॅरा ऑलिम्पिक),

प्रतीक्षा देवांग (फुटबॉल), भावेश भाटिया (मैदानी खेळ), सुहास कर्णिक व डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (दिव्यांग व्यक्तींसाठी क्रीडा धोरण), डॉ. ऋचा सुळे (मानसशास्त्र), यशवंत जाधव (मलखांब), आरती लिमजे (गोलबॉल), समीर तळवलकर (क्रीडा व परिवर्तन) यांनी मार्गदर्शन केले. ‘नॅब’चे मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, को-चेअरपर्सन स्नेहल देव, ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनचे महासचिव डॉ. माधव गोरे उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While felicitating national and international athletes in state level sports conference for the visually impaired
Scholarship News : परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा आधार; ‘सारथी’ची शुक्रवारपर्यंत मुदत

या खेळाडूंचा झाला गौरव

निकेत दलाल (छत्रपती संभाजीनगर), सागर बोडके (नाशिक), आरती लिमजे, तृप्ती वझिरानी, फातेमा मंथळकर, सुषमा सोनवणे, वैशाली साळगावकर, कृष्णा शेठ, सरिता कटारिया, सुशांत चौघुले, राहुल नावघाणे, स्वप्नील शहा, ओंकार तळवलकर, आदित्य तळवलकर, निशी जरीवाला, प्रियंका घुमरे, सिद्धी दळवी (सर्व मुंबई), युसूफ बालपरिया (पुणे), सुनंदा आंधळे (अमरावती) या खेळाडूंचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची पाठ

दिव्यांग खेळाडूंसाठी प्रथमच राज्यस्तरीय परिषद नाशिकमध्ये पार पडली. यासाठी राज्यभरातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू नाशिकमध्ये आलेले असताना जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील या कार्यक्रमास हजर राहिल्या नाहीत. याविषयी ‘नॅब’च्या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे खंत व्यक्त केली.

While felicitating national and international athletes in state level sports conference for the visually impaired
Nashik Lumpy Disease : जिल्ह्यात जनावरांचा बाजार बंद; लम्पीबाधित क्षेत्र म्हणून जिल्हा घोषित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.