Nashik Rain Update: दारणा धरणातून 4 हजार 205 क्यूसेक विसर्ग; धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढ

Traffic jammed on the highway due to thick fog with continuous stream
Traffic jammed on the highway due to thick fog with continuous streamesakal
Updated on

Nashik Rain Update : तालुक्यात वरुणराजाने एक दिवस उसंत घेऊन गुरुवार (ता. २७)पासून पुन्हा जोरदार वृष्टी सुरू केली. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

संततधारेमुळे तालुक्यातील भावली, भाम, दारणा धरणाच्या जलसाठ्यात भरीव वाढ झाली आहे. भावली धरण चार ते पाच दिवसांपासून ओसंडून वाहत आहे, तर दारणा धरणात ७८ टक्के साठा झाला आहे.

दारणा धरणातून गुरुवारी सायंकाळपासून तीन हजार ५८४ क्यूसेकऐवजी चार हजार २०५ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तालुक्यात ४८ तासांत १२७ मिलिमीटर पाऊस झाला असून, तालुक्यातील दारणा, भाम व भावली नद्यांसह लहान-मोठे ओहोळ प्रवाहित झाले आहेत. (4 thousand 205 cusecs discharge from Darna Dam Rapid increase in dam stock Nashik Rain Update)

पश्चिम भागात शेतांमध्ये साचलेले पाणी
पश्चिम भागात शेतांमध्ये साचलेले पाणीesakal

गेल्या ४८ तासांत १२७ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली असून, गुरवारअखेर तालुक्यात एक हजार ७५२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

इगतपुरी शहरासह घोटी व भावली धरण परिसरात जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. कसारा घाटातही मुसळधार पावसासह धुके पसरले आहे.

इगतपुरी शहरासह तालुक्यात पहिल्या २४ तासांत ८० मिलिमीटर, तर दुसऱ्या २४ तासांत ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्यातील पूर्वभागासह भातलागवडीच्या कामांना वेग आला आहे.

तालुक्याच्या पाश्चिम भागात पावसाने समाधानकारक वृष्टी केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, भातलागवडीसाठी पहाटेपासूनच लगबग होताना दिसून येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Traffic jammed on the highway due to thick fog with continuous stream
Nashik Kumbh Mela 2023: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ॲक्शन प्लॅन! NMC आयुक्तांच्या सर्व विभागांनी विशेष सूचना

तालुक्यातील त्रिंगलवाडी, बलायदुरी, आडवण, टाकेघोटी, बोरटेंभे, भावली, मानवेढे, बोर्ली, गिरणारे, टिटोली, नांदगाव सदो,पिंपरी सदो, तळेगाव, आवळखेड, दौंडत, चिंचलेखैरे, देवळे, खैरगाव खंबाळे, इंदोरे, गिरणारे, काळुस्ते, शेनवड, मुंढेगाव, घोटी, माणिकखांब या भागातही गुरुवारी समाधानकारक पाऊस झाला.

आजअखेर धरणांतील साठा असा

दारणा : ७७.९४ टक्के

मुकणे : ५७.६७ टक्के

वाकी : ३१..७९ टक्के

भावली : १०० टक्के

भाम : ६८.९१ टक्के

कडवा : ४५.२० टक्के

वालदेवी : ३२.४० टक्के

गंगापूर : ६२.३८ टक्के

Traffic jammed on the highway due to thick fog with continuous stream
Chandrashekhar Bawankule: जो आमच्या सोबत, त्याला दुप्पट : चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.