येवल्यात दहावीचे पोरं लई हुशार! अवघ्या तालुक्यात एकच जण नापास

Ssc result
Ssc resultesakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : नववी व दहावीची सरासरी तसेच शाळांकडे असलेल्या अधिकाराचा फायदा विद्यार्थ्यांना झाला असून, विद्यार्थ्यांनी गुणांचे उड्डाणे घेत छप्पर फाडके गुण मिळवले आहेत. तालुक्यातील ४९ शाळातील तब्बल ४ हजार ६२९ विद्यार्थ्यांपैकी केवळ एकच जण अनुत्तीर्ण झाला असून, तालुक्‍याचा निकाल ९९.९७ टक्के इतका लागला आहे. (4 thousand 629 students from 49 schools in Yeola taluka passed ssc exam)

दहावीच्या परीक्षेत गुणांची उड्डाणे

दहावीच्या परीक्षेत गुणांचे उड्डाणे यंदाही विद्यार्थ्यांनी घेतली असून, तालुक्यातून तब्बल पाचशेवर विद्यार्थ्यांनी गुणांची नव्वदी पार करून ९८ टक्क्यांपर्यत झेप घेतल्याचा अंदाज आहे. तर, शाळांचा निकाल गेल्या काही वर्षीपेक्षा तब्बल ८ ते १२ टक्का वाढला आहे. तालुक्याचा दहावीचा सरासरी निकाल २०१६ मध्ये ९२ तर २०१९ मध्ये ८८.६० व २०२० मध्ये ८९.३३ टक्के लागला होता. मागीलवर्षी केवळ चारच शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. यंदा मात्र ४८ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. शाळा स्तरावरील गुणादानामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नशीब फळफळले असून, सहजपणे उत्तीर्ण होण्यासह गुणपत्रक देखील गुणांनी भरले आहे. तालुक्यातील ४ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, यातील एक जण वगळता सर्व उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १ हजार ८३४ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर २ हजार १९५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय श्रेणी ५८७ व केवळ १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्‍याचा निकाल ९९.९७ टक्के लागला आहे. अंदरसूल येथील एस. जी. सोनवणे विद्यालयाचा निकाल ९८.९० टक्के लागल्याने तालुक्याचा एकत्रित निकाल १०० टक्के लागलेला नाही.

Ssc result
मोलमजुरी करणाऱ्या आईच्या कष्टाला बळ; सावित्रीच्या लेकींची दहावीत भरारी

विज्ञान शाखेकडे सर्वाधिक कल

सर्वच विद्यार्थ्यांचे गुणपत्रक गुणांनी भरल्याने आता विद्यार्थ्यांचा अकरावी विज्ञान शाखेकडे सर्वाधिक कल असणार आहे. वाणिज्यकडे सुमार तर कला शाखेकडे अत्यल्प ओढा असल्याचे चित्र यंदा पण आहे. तसेच, पॉलिटेक्निककडे अनेक विद्यार्थ्यांचा ओढा असून, अनेकांनी सुट्टीतच महाविद्यालये देखील निवडल्याचे चित्र आहे.

''नववी व दहावीच्या सरासरी निकालाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. यामुळे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले असले तरी गुणवंत विद्यार्थी मात्र निकालात टॉपरच राहिल्याचे दिसते.'' - सी. बी. कुळधर, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, येवला

Ssc result
यशाचा आनंद घेण्यापूर्वी 'ती' जगातून केव्हाच निघून गेली...

'या' शाळांचा निकाल लागला शंभर टक्के

तालुक्यातील गुरुदत्त विद्यालय धामोडे, एसएनडी इंग्लिस मीडियम बाभुळगांव, डी. पॉल येवला, समता विद्यालय सुरेगाव, न्यू इंग्लिश स्कूल उंदिरवाडी, जनता विद्यालय गवंडगाव, मुक्तानंद विद्यालय बोकटे, बल्हेगाव विद्यालय, जनता विद्यालय देशमाने, जनता विद्यालय मुखेड, विवेकानंद विद्यालय एरंडगाव, न्यू इंग्लिश स्कूल नगरसूल, मा. वि. विद्यालय राजापूर, नूतन विद्यालय ममदापूर, पवार विद्यालय धुळगाव, पुण्यश्‍लोक विद्यालय अनकाई, संतोष विद्यालय बाभुळगाव, म.फुले विद्यालय कुसूर, भुलेश्‍वर विद्यालय भुलेगाव, जनता विद्यालय पाटोदा, माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी, न्यू इंग्लिश स्कुल सावरगाव, संत ज्ञानेश्‍वर विद्यालय कातरणी, सावित्रीबाई फुले विद्यालय सोमठाण देश, जय योगेश्‍वर विद्यालय शिरसगाव, आदर्श विद्यालय चिचोंडी, राजा शिवाजी विद्यालय ठाणगाव, मुक्तानंद विद्यालय येवला, एन्झोकेम हायस्कूल येवला, जनता विद्यालय येवला, एंग्लो उर्दू येवला, गर्ल्स उर्दू येवला, न्यू इंग्लिश स्कुल तळवाडे, संतोष विद्यालय रहाडी, भारम विद्यालय, सरस्वती विद्यालय सायगाव, धामणगाव विद्यालय, सरस्वती विद्यालय खरवंडी, जनता विद्यालय अंगणगाव, जनता विद्यालय कुसमाडी, जनता विद्यालय निमगाव मढ, मातोश्री इंग्लिश मिडीयम अंदरसूल, नगरसूल आश्रमशाळा, संत जनार्दन विद्यालय, शासकीय वसतिगृह बाभूळगाव, अँग्लो उर्दू, उर्दू गर्ल्स, आत्मा मलिक पुरणगाव या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()