Nashik Crime News : नाशिकरोडला पुन्हा 4 गाड्याची तोडफोड

Damage done to the rickshaw.
Damage done to the rickshaw. esakal
Updated on

Nashik Crime News : जयभवानी रोडवरील भालेराव मळा, माणिकनगरमधील जुन्या भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी (ता. ११) रात्री दोन चारचाकीसह दोन दुचाकीची तोडफोड करण्यात आली.

गुन्हा घडताच काही तासात उपनगर पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले. (4 vehicle smash again on Nashik road Nashik Crime News)

याबाबत नीलेश ज्ञानेश्वर भोई यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री संशयित हर्षद ऊर्फ बाळा गोविंद पवार (२०, रा. माणिकनगर) याने रात्री कदम लॉन्सजवळील दुकानाच्या व आसपास बाहेर उभे असलेल्या चारचाकी, दोन मोटरसायकल व रिक्षाला दगड मारून काचा फोडल्या.

घटनेची माहिती उपनगर पोलिसांना समजतात उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त आनंदा वाघ, वरिष्ठ निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विनोद लखन, अनिल शिंदे, जयंत शिंदे, सूरज गवळी, पंकज कर्पे यांनी काही तासात संशयितास ताब्यात घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Damage done to the rickshaw.
Nashik Crime News : नाशिकरोड हादरले! धोंगडेनगर परिसरात चारचाकी वाहनांचे नुकसान; 3 दिवसांत 3 मोठ्या घटना

मागील पंधरवड्यात विहीतगाव येथील एका सोसायटीमधील चार गाड्यांची जाळपोळ करून पंधरा गाड्याची तोडफोड दोन मद्यपी युवकांनी केली होती.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंदनगर, धोंगडे मळ्यात पाच ते सहा चारचाकी गाड्यांचे नुकसान करून नऊ युवकांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिसांनी संशयित गुन्हेगारांना तत्काळ ताब्यात घेतले होते. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी धोंगडे मळ्यात दहशत निर्माण करणाऱ्या 9 संशयितांविरुद्ध मोका कारवाई केली. .

Damage done to the rickshaw.
Nashik Crime News : पोलिसाची कॉलर धरणाऱ्यास 6 महिन्यांचा कारावास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.