Nashik Crime News : मारहाणीत 4 वर्षीय बालकाचा मृत्यू; संशयित तरुण गजाआड

crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime News : विवाहितेस तिच्या चार वर्षांच्या बालकासह पळवून आणत सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे वास्तव्यास असलेल्या वीस वर्षीय तरुणाने रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत सदर बालकाचा मृत्यू झाला.

दवाखान्यात उपचारासाठी आणल्यावर या बालकाचा मृत्यू झाल्याचे समजताच संशयित तरुणाने धूम ठोकली होती, मात्र एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याला दिंडोरी तालुक्यातून बेड्या ठोकत गजाआड केले. (4 year old boy dies in beating Suspect youth behind bars at sinnar Nashik Crime News)

गणेश उर्फ अमोल नाना माळी (20) राहणार बोकडदरे तालुका निफाड असे संशयीताचे नाव आहे. तो काही दिवसांपूर्वी बोकडदरे येथीलच काजल नामक विवाहितेला व तिच्या चार वर्षांच्या कृष्णा या मुलाला घेऊन पळून आलेला होता.

हे दोघे केल्या पंधरा दिवसांपासून गुळवंच येथील एका शेतकऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून कामाला थांबले होते. गुरुवारी सायंकाळी शेतातील काम आटोपून घरी आलेल्या गणेशने कुरपत काढत काजल सोबत भांडण केले.

मुलगा कृष्णा याने शर्ट उलटा का घातला असे म्हणत त्याने रागाच्या भरात या बालकाला काठीने मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला मार लागला होता. काही वेळानंतर काजल हिने कृष्णाला चहा पाजला. मात्र त्रास होऊ लागल्यावर दोघेही कृष्णाला घेऊन सिन्नर येथील एका बालरोग तज्न्याकडे गेले होते.

तेथे तपासल्यावर डॉक्टरांनी बालकास सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघेही तेथे आले. सदर बालकास तपासले असतात तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. कृष्णा याचा आपल्याकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे पाहून घाबरलेल्या गणेश याने काजल हिला रुग्णालयातच सोडून देत पळ काढला.

रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक शामराव निकम सहाय्यक निरीक्षक संदेश पवार यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत घटनेची माहिती घेतली.

संशयित गणेश आणि काजल हे दोघे तिचा नवरा व्यसनी असल्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून एकत्र राहत होते. काजल ही विवाहित असून तिला दोन मुले आहेत. त्यापैकी एका मुलाला म्हणजेच कृष्णा याला सोबत घेऊन ती गणेश सोबत गुळवंच येथे आली होती. तर तिचा आणखी एक मुलगा बोकडदरे येथेच तिच्या पतीकडे राहतो.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

crime
Cyber Crime : युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं अन् खटक्यात उडले ८ लाख रुपये; तुमच्यासोबतही 'हे' होऊ शकतं

घटनेची पार्श्वभूमी समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. निकम यांनी निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांना माहिती दिली. संशयित गणेशच्या तपासासाठी सहाय्यक निरीक्षक श्री. पवार, हवालदार बापू महाजन, धनाजी जाधव, संजय बागुल, विनोद जाधव, नितीन काकड यांचे पथक रवाना केले.

निफाड पोलीस ठाणे, बोकडदरा येथील सरपंच व पोलीस पाटील यांना घटनेबाबत माहिती देण्यात येऊन गणेशच्या शोधासाठी त्यांची मदत घेण्यात आली. मात्र फरार झालेला गणेश गावाकडे फिरकला नव्हता.

त्याचा मोबाईल फोन देखील बंद होता. त्याच्या आईवडिलांकडे चौकशी करूनही त्याच्याबद्दल माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित केले. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील आत्याच्या मोबाईल वरून गणेशने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला आणि पोलिसांना त्याचा ठाव ठिकाण समजला.

पोलीस पथकाने तात्काळ मोहाडी येथे जाऊन गणेशच्या मुसक्या आवळल्या. घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी मुख्य संशयतास गजाआड केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित गणेश उर्फ अमोल माळी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Cyber Crime : युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं अन् खटक्यात उडले ८ लाख रुपये; तुमच्यासोबतही 'हे' होऊ शकतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.