Nashik Crime News : रेल्वे कर्मचारी मारहाणप्रकरणी आरोपीस 4 वर्षांचा कारावास!

Court Order
Court Orderesakal
Updated on

नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्थानकात केंद्रीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. यू. जी. मोरे यांनी चार वर्षांचा कारावास आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच सरकारी कर्मचाऱ्यावरील हल्ला हा कायदा सुव्यवस्थेवरील हल्ला असल्याचे त्यांनी निकाल देताना नमूद केले. (4 years imprisonment for accused in case of beating railway staff Nashik Crime News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Court Order
Nashik News: भाजीपाला उत्पादक मेटाकुटीला; आवक प्रचंड वाढल्याने बाजारभाव गडगडले

ख्वाजा मोहमंद शेख (३८, रा. देवीचौक, नाशिक रोड) असे आरोपीचे नाव आहे. २३ ऑगस्ट २०१८ रोजी मध्यरात्री सव्वा वाजता शेख हा एका महिलेस मारहाण करत होता. त्याचवेळी स्टेशन मास्तर कार्यालयातील रेल्वे कर्मचारी आनंदा चाबुकस्वार यांनी धाव घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, शेख यानने त्यांचा सदरा फाडत धक्काबुक्की केली.

तसेच मारहाण केली. चाबुकस्वार स्वतःचा बचाव करण्यासाठी स्टेशन मास्तर कार्यालयात गेले असता शेखने त्यांच्या मागे धाव घेत लोखंडी खुर्ची मारली. त्यात ते जखमी झाले होते. शेखसोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने स्टेशन मास्तरांच्या टेबलावरील टेलिफोन आपटल्याने नुकसान केले होते. चाबुकस्वार यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल होता. प्रभारी अधिकारी अश्विनी पाटील यांनी शेखला अटक करून नाशिक सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

लोहमार्गाच्या तत्कालीन अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक गणेश शिंदे, दीपक काजवे यांनी तपासासाठी मार्गदर्शन केले. नाशिक रोड रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जय भवर यांनी पाठपुरावा केला. हवालदार संतोष उफाडे, विजय कपिले यांनी सहाय्य केले. अॅड. आर. एल. निकम यांनी सरकारतर्फे युक्तिवाद करून नऊ साक्षीदार तपासले.

Court Order
Nashik News : द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या झुंडीचा हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()