Nashik Water Scarcity : भर पावसाळ्यात पाणीबाणी...! ऑगस्ट उजाडला तरी 16 टँकर सुरू

Water Scarcity Residents of Bhusari Colony water supply pune kothrud
Water Scarcity Residents of Bhusari Colony water supply pune kothrudsakal
Updated on

Nashik Water Scarcity : पावसाळा सुरू होऊन दोन महिने संपले असून आता ऑगस्ट महिना सुरू झाला तरी येवला तालुक्यातील बंधारे, नदी, नाले कोरडेच आहेत. भूजल पातळीही खालावलेलीच असल्याने पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही.

आजही ४० गावे वाड्यांना १६ टँकरद्वारे रोज पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळ्यातील हे भीषण वास्तव आगामी संकटाची चाहूल न देणारे ठरावे अशी भावना नागरिक व्यक्त करीत असून रोज पावसासाठी धावा करत आहेत. (40 villages and wadis are being supplied with water daily by 16 tankers nashik water scarcity news)

ब्रिटिशकालीन अवर्षणप्रवण असलेला तालुका. उत्तर पूर्व भागातली शेती देखील आठमाहीच होते. किंबहुना फेब्रुवारी-मार्चनंतरच अर्ध्या तालुक्याला टंचाईची धग जाणवू लागते अन टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागतो. मागील वर्षी डिसेंबर संपेपर्यंत पाऊस कोसळत होता तरीही मार्चपासून तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढीस लागली होती.

मार्चमध्येच टँकरचे प्रस्तावही आले होते. १० एप्रिलपासून प्रत्यक्षात टँकर सुरू झाले, ते आजतागायत सुरूच आहेत. यंदा मुसळधार पाऊस अद्याप पाहण्यासही मिळाला नसून रिमझिमवर खरीप हंगाम फुलला आहे. किंबहुना उत्तर पूर्व भागात तर अनेक ठिकाणी खोलवर ओल देखील नसल्याने दोन दिवस रिमझिम सरीला विराम मिळाला तरी पिके माना टाकतात.

अद्यापही बंधारे, नदी, नाले कोरडेठाक असल्याने भूजलपातळी प्रचंड खाली आहे. परिणामी विहिरी, कूपनलिकांना पाणीच उतरलेले नाही. एकीकडे शेतात हिरवीगार पिके दिसतात तर दुसरीकडे प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली असल्याने अद्यापही गाव-वस्त्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Water Scarcity Residents of Bhusari Colony water supply pune kothrud
Dhule Water Scarcity : जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा 23.68 टक्के साठा; पाणीटंचाईच्या झळा

सध्या १६ टॅंकरद्वारे १२ वाड्या, २८ गावे अशा ४० ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अल्प प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने नऊ ठिकाणचे टँकर मात्र बंद झाले ही समाधानाची बाब मानली जात आहे. ३१ जुलैपर्यंत टँकर मुदत होती, मात्र परिस्थितीच बिकट असल्याने पुन्हा एकदा १५ ऑगस्टपर्यंत टँकर सुरू ठेवण्यास प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी मुदतवाढ दिली आहे.

टॅंकर सुरू असलेली गावे

ममदापूर, खरवंडी, देवदरी, तळवाडे, जायदरे, आहेरवाडी, कोळगाव, वाईबोथी, आडसुरेगाव, रेंडाळे, कोळम, वसतनगर, भुलेगाव, अनकाई, नगरसूल, कासारखेडे, देवठाण, खामगाव, चांदगाव, पन्हाळसाठे, भायखेडा, पिंपळखुटे तिसरे, धनकवाडी, पांजरवाडी, नायगव्हाण, लहीत, सोमठाण जोश, हडप सावरगाव, पिंपळखुटे बुद्रुक, रायते, वाघाळे, राजापूर या गावांसह परिसरात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

जोरदार पाऊस होऊन जलस्रोतांना पाणी उतरेपर्यंत या टँकरची गरज असून मागणी असेपर्यत टँकर सुरु राहतील असे पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागप्रमुख रफिक शेख यांनी सांगितले.

Water Scarcity Residents of Bhusari Colony water supply pune kothrud
Nashik Water Scarcity : राज्यात पावसाअभावी आठवड्यात अधिकचे 47 टँकर; नाशिक, नगर, साताऱ्यात अधिक टँकर

शहराला चार दिवसांआड पाणी!

अशीच पाणीबाणीची अवस्था शहराची असून शहरालाही चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. दरवेळेस जून-जुलैत धरणे ओव्हर फ्लो होऊन पाणी मिळत असल्याने तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मात्र सध्या पालखेड धरण समूहात केवळ ५३ टक्केच पाणीसाठा आहे.

त्यामुळे आवर्तनाचे किंवा ओव्हरफ्लोचे पाणी मिळेपर्यंत शहरावर टंचाईचे गडद ढग आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची पातळीही खालावत असल्याने आता पालखेडच्या पाण्याची शहरवासीयांना आवश्यकता असली तरी शक्यता कमीच आहे.

यामुळे पुन्हा शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली चालू आहेत. यामुळे मुसळधार पाऊस होऊन धरणसाठा वाढला तर आवर्तन मिळू शकणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी धोधो पाऊस पाडण्याची आस लागली आहे.

Water Scarcity Residents of Bhusari Colony water supply pune kothrud
Nashik Water Scarcity : दिंडोरीतील धरणे अद्याप अतृप्तच; जोरदार पावसाअभावी जेमतेम साठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()