Nashik Krushithon: कृषिथॉन प्रदर्शनात 400 कोटींची उलाढाल; पावणेदोन लाख नागरिकांची भेट

400 crore turnover at Krushithon exhibition
400 crore turnover at Krushithon exhibitionesakal
Updated on

नाशिक : कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या कृषिथॉन प्रदर्शनाची यशस्वी सांगता झाली. पाचदिवसीय या प्रदर्शनात ४०० कोटींची उलाढाल झाली असून, पावणेदोन लाख नागरिकांनी याला भेट दिल्याची माहिती आयोजक साहिल न्याहारकर यांनी दिली. (400 crore turnover at Krushithon exhibition Meeting of two lakh citizens nashik)

प्रवास लेखक व ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्या.चे सह व्यवस्थापकीय संचालक दत्तात्रय भडकवाड, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, ॲग्री टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक पांडुरंग तावरे, कृषी पर्यटन व्यावसायिक सगुणा बागेचे संचालक चंदन भडसावळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

श्री. गुणाजी म्हणाले, की माझी भटकंती नेहमी सुरू असते. यात मी शेती व शेतकरी पाहत असतो. मी काही कृषी पर्यटनाला भेट दिली आहे. कृषी पर्यटनाचा पूरक व्यवसाय शेतीत करावा, असे मत त्यांनी या वेळी मांडले.

सरदेसाई-राठोड यांनी शासनाच्या कृषी पर्यटन नोंदणीविषयी माहिती दिली. शासन कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले. चंदन भडसावळे म्हणाले, की सगुणा बागेत एक हजार पर्यटक दरदिवशी येतात.

२० हजार विद्यार्थी सगुणा बागेला भेट देतात. आमच्याकडे १८० लोक काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

400 crore turnover at Krushithon exhibition
Rajya Natya Spardha: युद्धाच्या अस्थिरतेतून शांततेचा शोध घेणारी ‘उम्मीद’

या वेळी कृषी पर्यटन केंद्र सन्मान एकनाथ मुळे (कुसुम कृषी पर्यटन केंद्र, जालना), हरीश जखेटे (चैतन्य ऍग्रो टुरिझम, छत्रपती संभाजीनगर), डॉ. संजय टाकळकर (श्रीराम बाग कृषी पर्यटन, परभणी), जोस कन्नई (कन्नई कृषी पर्यटन केंद्र, घारणी), राही वाघानी (मोंटेरिया व्हिलेज, कोल्हापूर), चंदन भडसावळे (सगुणा बाग, कर्जत),

सतीश मोहोड (ग्रीशाचे कृषी पर्यटन, कळमेश्वर, नागपूर), हृषिकुमार युवराज थेंबरे (लक्ष्मी गो कृषीपर्यटन केंद्र, गोंदिया), मंजूषा योगेंद्र मोडक (योरामा-मायारा कृषी पर्यटन केंद्र, गडचिरोली), नीलेश खेडकर (सूर्यास्त कृषी पर्यटन केंद्र,

नांदगाव खंडेश्वर अमरावती), शिशिर अरुण कुलकर्णी (अनंत हेरिटेज कृषी पर्यटन केंद्र, मौजे झुंजारपूर, यवतमाळ), राहुल नीलकंठराव देशमुख (नेचर अग्रो फार्म कृषी पर्यटन केंद्र, कारंजा लाड, वाशीम), आनंदराव गणपत शिंदे (आनंद कृषी पर्यटन केंद्र, बोरेगाव, सातारा),

डॉ. संतोष सूर्यवंशी, डॉ. प्रदीप तावरे (स्वग्राम आयुर्वेद योग निसर्ग कृषी पर्यटन, लवळे मुळशी, पुणे), राजू भादर कवठेकर (अभिषेक कृषी पर्यटन केंद्र, सोलापूर), अंजना केवळ देवरे (शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र, वाजगाव, देवळा),

हरिराम देवराम थविल (रान झोपडी कृषी पर्यटन केंद्र, गारमाळ, सुरगाणा), रमेश नाथा भांबरे (मामाचा मळा कृषी पर्यटन केंद्र, रुईछत्तीसी, अहमदनगर) या कृषी पर्यटन केंद्रांचा गौरव करण्यात आला.

400 crore turnover at Krushithon exhibition
Nashik News: शिवरायांच्या भव्यतेचे ग्रंथ रांगोळीतून दर्शन! 1 डिसेंबरपर्यंत उपक्रमाचा आस्वाद घेता येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.