Godavari Maha Aarti : गोदावरी हा नाशिक शहराच्या आस्थेचा विषय असल्याने त्यात श्रेयाच्या विषयच येऊ नये म्हणून आरतीच्या समितीत आमदार नकोच अशी औदार्याची भूमिका घेत आज प्रा. देवयानी फरांदे आणि ॲड राहुल ढिकले यांनीच समितीत आमदार नको, अशी उदार भूमिका घेतली.
तसेच केवळ पुरोहिताशिवाय इतरही विविध क्षेत्रातील मान्यवरांची स्वतंत्र समिती असावी. तसेच दोन टप्प्यात ४२ कोटीचे दोन प्रस्ताव पाठवून शासनाकडून त्यास मंजुरी घ्यावी, असा निर्णय आज गोदावरी आरती नियोजन बैठकीत घेण्यात आला. (42 crore plan for Godavari Maha Aarti in two phases nashik news)
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.२८) झालेल्या बैठकीत आमदार प्रा.देवयानी फरांदे आणि ॲड राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस उपायुक्त किरण चव्हाण,
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, जलसंपदा विभागाचे अभियंता सागर शिंदे, पुरोहित संघाचे शांताराम शास्त्री भानोसे, सतीश शुक्ल आदींसह पुरोहित उपस्थित होते. दरम्यान, कॉक्रीटीकरण विषयावर मात्र गोलमोल चर्चा झाली.
आमदार नकोच
बैठकीत दोन्ही आमदारांनी गोदावरी हा नाशिकचा विषय आहे. तर आमदार पद हे ठराविक कालमर्यादेचे पद असते. त्यामुळे आरतीच्या विषयात वादाचा आणि श्रेयाचा विषय येवू नये म्हणून आरतीसाठी स्वतंत्र समिती नेमली जावी.
आम्ही आमदार असून ही भूमिका मांडतो की, गोदावरी आरती समितीत आमदार घेऊ नये. गोदावरी आरतीसाठी जी स्वतंत्र समिती नेमली जावी. त्यात, शहरातील विविध क्षेत्रातील सर्व स्तरातील मान्यवरांना समाविष्ट करून घ्यावे, जेणे करून स्वतंत्र समिती सर्वसमावेशक होईल, अशी सूचना मांडली.
ॲड ढिकले यांनी शासनाकडून आराखडा मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रा.फरांदे यांनी प्रसंगी आराखडा मंजुरीसाठी आगामी अधिवेशनात यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
दोन टप्प्यात प्रस्ताव
महाआरती ही गोदावरी नदीच्या सन्मानाचा विषय आहे. त्यामुळे आरती नदीची व्हावी गटारीची नव्हे ही लोकभावना असल्याने हा विषय पुढे नेतांना मलनिस्सारण केंद्रासह शुद्धीकरणाचा प्रस्ताव तयार केला जावा पहिल्या टप्प्यात मलनिस्सारण केंद्रासह मूलभूत सुविधांचा आराखडा तयार केला जावा.
पहिल्या टप्प्याच्या आराखड्यात स्थापत्य विषयक कामांचा आराखडा तयार केला जावा. दुसऱ्या टप्प्यात रोषणाई आणि सजावटीचा आराखडा तयार केला जावा. त्यात साधारण आधी तिची स्वच्छता तसेच प्लॅटफॉर्म, रोषणाई यासह ३२ कोटीचा आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना मांडली.
स्वच्छतेसाठी आग्रह
पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांनी गोदावरी नदीला न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस संरक्षण मिळाले आहे.
मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत मांडली. महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी नदीच्या स्वच्छतेसाठी आग्रह धरताना सामुहीक जबाबदारी समजून प्रत्येक घटकाने गोदावरी स्वच्छतेसाठी योगदान द्यावे. दशक्रिया विधीसह इतर धार्मिक विधी दरम्यान अन्नदान केले जाते.
जर महापालिकेच्या निराधार आधार केंद्रात अन्नदान दिले गेले तर अन्नाची नासाडी आणि नदीत घाण टाळता येईल. तसेच प्लास्टीकसह कचरा नदीत पडणार नाही, यासाठी सातत्यपूर्ण जनजागृती केली जावी. अशी मागणी केली.
गोदेला अधिकार देऊ या
बैठकीला गोदावरी कॉक्रीटीकरण विरोधात याचिका दाखल केलेले याचिकाकर्ते मात्र नव्हते. त्यामुळे त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, देवांग जानी म्हणाले की, गोदावरी आरती हा
नाशिककरांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यात सर्वानी सहकार्य केलेच पाहिजे. पण नदीपात्रातील कॉक्रीटीकरणामुळे नदीचा हक्क हिरावला गेला आहे. गोदावरी नदीला मुक्त वाहण्याचा अधिकार आहे. कॉक्रीटीकरण काढून आपण सर्व नाशिककरांनी आधी नदीला वाहण्याचा अधिकार देऊन नदीला नदीपण देऊ या...असे मत मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.