नाशिक : कृषीपंढरी अन प्रयोगशील शेतकऱ्यांचा (Farmer) जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. त्याचवेळी निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे नुकसान मोठ्याप्रमाणात होऊ लागले आहे.
अशाही परिस्थितीत मोठा खरीप हंगाम असलेल्या जिल्ह्यातील आतापर्यंत गेल्यावर्षीच्या तुलनेत ४२ टक्के शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत (PM crop insurance scheme) सहभाग नोंदवला आहे. दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात प्रतिसादाचा अभाव प्रकर्षाने पुढे आला आहे. (42 percent farmers participation in PM crop insurance scheme compared to last year Nashik Latest Marathi News)
पीकविमा योजनेत सहभागासाठी आता जेमतेम पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार ७३७ शेतकरी गेल्यावर्षी पीकविम्यात सहभागी झाले होते. आता ५८ हजार ९४८ शेतकऱ्यांचा सहभाग मिळाला आहे.
दिंडोरी तालुक्यातील ८१ आणि नाशिक तालुक्यातील ६० शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. गेल्यावर्षी दिंडोरी तालुक्यातील ३२९ शेतकऱ्यांनी २१६ हेक्टर, तर नाशिकमधील ४४८ शेतकऱ्यांनी २४३ हेक्टरवरील पिकांचा विमा घेतला होता.
गेल्यावर्षी १३ हजार ५६० कर्जदार, तर एक लाख २८ हजार ८७७ अशा एकूण एक लाख ४१ हजार ७३७ शेतकऱ्यांनी ९१ हजार ८१ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवला होता. पीकविमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांमधील कर्जदारांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्याची पुनर्रावृत्ती यंदा होण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसताहेत.
पीकविमा योजनेतील सहभाग
तालुक्याचे नाव गेल्यावर्षीची शेतकरी संख्या यंदाची शेतकरी संख्या
बागलाण १३ हजार ८३२ ५ हजार ७००
चांदवड १३ हजार ३७५ ३ हजार ९११
देवळा ९ हजार ११ २ हजार
इगतपुरी १२ हजार २५० ७ हजार ४००
कळवण २ हजार ९६८ ३ हजार ४००
मालेगाव ३७ हजार ६८ १७ हजार ५००
नांदगाव १९ हजार ७५० ९ हजार ४२०
निफाड ५ हजार ८३७ २ हजार ६७६
पेठ ७ हजार २१९ ९००
सिन्नर ६ हजार ६२८ १ हजार ४००
सुरगाणा ४ हजार ३३३ १ हजार २००
त्र्यंबकेश्वर ३ हजार ४२४ १ हजार
येवला ५ हजार २५९ २ हजार ३००
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.