Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी जिल्हा यंत्रणेचा 435 कोटींचा शासनाकडे प्रस्ताव

Onion
Onionesakal
Updated on

Pune Onion Subsidy News : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरविले असून, या शेतकऱ्यांच्या अनुदानापोटी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाच्या पुणे येथील पणन विभागाकडे पाठविला आहे.

फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत कांद्याचे भाव कोसळल्याने उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हाती आला नाही.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या हेतूने शासनाने प्रतिक्विंटल कांद्याला ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. (435 crore proposal of district system to government for onion subsidy nashik news)

मात्र, अद्याप शेतकऱ्यांना कांदा अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत कांद्याचे भाव गडगडल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेल्यांच्या कांदा अनुदानासाठी शासनाकडे मागणी केली होती.

खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत अनुदानाची मागणी केली. जिल्ह्यातील तालुकास्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्या, पणन परवानाधारक, खासगी बाजार आणि नाफेड या संस्थांमार्फत कांदा खरेदी केला जातो. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत वरील चारही संस्थांकडून एक कोटी २४ लाख ४६ हजार क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion
Onion Subsidy : NCCFसाठी कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्‍न गंभीर; संस्थेचे नाव नसल्याने गोंधळ

कांद्याचे अनुदान मिळावे, यासाठी जिल्हाभरातून एक लाख ९३ हजार ८१८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. जिल्हा प्रशासनाच्या छाननीत २१ हजार ६६६ शेतकरी अपात्र ठरले असून, एक लाख ७२ हजार १५२ पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम ४३५ कोटी ६१ लक्ष २३ हजार ५७८ रुपये झाली.

अनुदानाची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांनी शासनाच्या पणन संचालकांकडे पाठविला आहे. यामुळे आता येत्या काही दिवसांतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट शासकीय अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

Onion
Onion Subsidy: सटाण्यात 13 हजार शेतकरी कांदा अनुदानास पात्र! त्रुटीमुळे 2 हजार शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()