Nashik Water Scarcity : राज्यात पावसाअभावी आठवड्यात अधिकचे 47 टँकर; नाशिक, नगर, साताऱ्यात अधिक टँकर

47 more tankers in week due to lack of rain in state nashik water scarcity news
47 more tankers in week due to lack of rain in state nashik water scarcity newsesakal
Updated on

Nashik Water Scarcity : कोकण, अमरावती, नागपूरसह छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या काही दिवसांत होत असलेल्या पावसामुळे हिंगोलीतील आठ, नांदेडमधील दोन, नंदुरबारमधील दोन, साताऱ्यातील एक, अमरावतीतील पाच, बुलढाण्यातील सहा टँकर बंद करण्यात आले आहेत.

मात्र, पावसाच्या अभावामुळे जळगावमध्ये पाच, नगरमध्ये चार, सांगलीत १०, छत्रपती संभाजीनगरमध्ये १३, तर जालन्यात ३९ टँकर एका आठवड्यात नव्याने सुरू करावे लागले आहेत. (47 more tankers in week due to lack of rain in state nashik water scarcity news)

राज्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १७ गावे आणि ९९ वाड्यांची तहान वाढल्याने प्रशासनाला अधिकच्या ४७ टँकरची व्यवस्था करावी लागली. शिवाय, पावसाने ओढ दिलेल्या नाशिक जिल्ह्यातील ६८ गावे आणि ३७ वाड्यांसाठी पूर्वीप्रमाणे ५८ टँकर कायम आहेत.

नाशिकसह नगर, सातारा जिल्ह्यातील टँकरची संख्या अधिक आहे. नगरमध्ये ६० गावे आणि ३४४ वाड्यांसाठी ५७, सातारा जिल्ह्यातील ५६ गावे आणि २७३ वाड्यांसाठी ५३ टँकर धावत आहेत. कोकण विभागात आतापर्यंत ११६.२, अमरावतीत १११.१, नागपूरमध्ये १०२.६, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९४.१ टक्के पावसाची नोंद झाली.

नाशिक विभागात ७२.८, तर पुणे विभागात ६४.६ टक्के असा कमी पाऊस झाला आहे. जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरची संख्या) : धुळे- १-० (१), जळगाव- ३८-० (४०), पुणे- ४४-२३० (३२), सांगली- १५-१०० (१७), सोलापूर- ९-६९ (९), छत्रपती संभाजीनगर- २०-१५ (३५), जालना- २६-१६ (३९), हिंगोली- १-० (१), वाशीम- १-० (१), बुलढाणा- १३-० (१३). गेल्या वर्षी २५ जुलैला नगरमधील २२ गावे व ६२ वाड्यांसाठी १३, पुण्यातील तीन गावे व १८ वाड्यांसाठी पाच, साताऱ्यातील पाच गावे व २८ वाड्यांसाठी तीन, सांगलीतील एका गावासाठी एक, अमरावतीतील चार गावांसाठी सात अशी एकूण ३५ गावे व १०८ वाड्यांसाठी २९ टँकर सुरू होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

47 more tankers in week due to lack of rain in state nashik water scarcity news
Nashik Rain Update: सिन्नर परिसरात बंधारे, विहिरी कोरड्याठाक; जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

सात जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस

नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व परभणी जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २५) सकाळपर्यंत ५० ते ७५, तर रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे. शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, नांदेड, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत झाला आहे.

राज्यातील धरणसाठ्यांची स्थिती

(जलसाठ्याचे आकडे टक्क्यांमध्ये दर्शवितात)

विभागाचे नाव धरण संख्या आजचा जलसाठा २५ जुलै २०२२ चा जलसाठा

नागपूर ३८३ ६०.६५ ६३.५१

अमरावती २५९ ५८.९८ ७१.४३

छत्रपती संभाजीनगर ९२० २७.११ ६१.४५

नाशिक ५३५ ३८.३५ ६२.२५

पुणे ७२० ४२.८१ ६२.८५

कोकण १७३ ७३.२८ ८१.८८

एकूण २,९९० ४५.५९ ६७.२३

47 more tankers in week due to lack of rain in state nashik water scarcity news
Nashik Water Scarcity : भर पावसाळ्यातही तहान भागते टँकरवर! येवल्यात टंचाईची साडेसाती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.