Obesity Problem : जागतिक आरोग्यदिनानिमित्त नाशिकमध्ये १ हजार ८०० व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये २५ वर्षांखालील ४७ टक्के महिला आणि ३६ टक्के पुरुषांमध्ये स्थूलतेचा धोका आढळून आला.
अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी, बैठेकाम करण्याची जीवनशैली, वाढता तणाव, मद्यपान आणि तंबाखूचे सेवन या कारणांमुळे लठ्ठपणाचा धोका आहे. (47 percent of women under 25 years of age in Nashik at risk of obesity nashik news)
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
जून २०२० ते डिसेंबर २०२२ पर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्यात आली. इंडस हेल्थ ॲब्नॉर्मलिटी अहवालातून १५ टक्के महिला आणि २३ टक्के पुरुषांना मधुमेह होण्याचा धोका पुढे आला आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा विशेषज्ञ अमोल नायकवडी म्हणाले, की तरुणांमध्ये लठ्ठपणाचे अधिक प्रमाण दिसून येत आहे.
नाशिकमधील महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे. मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यासाठी वेळेवर तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक व्यायाम आणि आरोग्यदायी आहारामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होऊ शकतो.
तसेच कोरोनानंतर लोक त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक बनले आहेत आणि तरुण पिढी व कुटुंबातील सदस्यांसह नियमितपणे आरोग्य तपासणी करण्यास येत आहेत, असे निदर्शनास आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.