SPPU Election : नाशिकचे 8 जागांसाठी 5 उमेदवार रिंगणात; पुणे विद्यापीठ व्‍यवस्‍थापन परिषदेसाठी 11ला मतदान

SPPU university
SPPU universityesakal
Updated on

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेत सदस्‍यपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. याअंतर्गत नामनिर्देश छाननीची प्रक्रिया बुधवारी (ता.१) पार पडली आहे. एकूण आठ जागांसाठी होत असलेल्‍या या निवडणुकीत नाशिकचे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत.

दरम्‍यान ११ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार असून, याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. (5 candidates for 8 seats of Nashik 11th Voting for Pune University Management Council nashik news)

पुणे विद्यापीठाच्‍या विविध गटांकरिता अधिसभा सदस्‍य निवडीची प्रक्रिया नुकताच काही महिन्‍यांपूर्वी पार पडलेली आहे. यामध्ये काही जागा बिनविरोध तर काही जागांवर मतदानाने अधिसभा सदस्‍यांची निवड करण्यात आलेली आहे.

या अधिसभा सदस्‍यांतून व्‍यवस्‍थापन परिषदेवर सदस्‍य म्‍हणून निवड केली जाणार असून, त्‍यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची प्रक्रिया काल (ता.२८) पर्यंत होती.

त्‍यानंतर बुधवारी (ता.१) नामनिर्देश पत्रांच्‍या छाननीची प्रक्रिया झाली. तर नामनिर्देश पत्र मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची मुदत उद्या (ता.२) सायंकाळी पाचपर्यंत आहे. निवडणुकीची प्रक्रिया शनिवारी (ता.११) विद्यापीठाच्‍या मुख्य इमारतीतील संत ज्ञानेश्‍वर सभागृह येथे पार पडणार आहे.

मतदानानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे. आठ जागांसाठी होत असलेल्‍या या निवडणुकीत विविध गटातून नाशिकचे एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

SPPU university
Nashik News : धावत्या नांदेड़- लोकमान्य टिळक एक्सप्रेसमधून निघाला धुर अन् प्रवाशांचा उडाला गोंधळ! मोठी हानी टळली

आठ जागांची विभागणी अशी-

व्‍यवस्‍थापन परिषदेवर सदस्‍यपदासाठीच्‍या एकूण आठ जागांपैकी प्राचार्य गटासाठी दोन जागा असून, एक खुला व एक अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अध्यापक व विद्यापीठ अध्यापक गटासाठी दोन जागा पैकी एक खुला व एक निरधिसूचित जमाती किंवा भटक्‍या जमातीसाठी राखीव.

व्‍यवस्‍थापन प्रतिनिधींकरीता दोन जागा पैकी एक खुला व एक अनुसूचित जमातीसाठी. तर नोंदणीकृत पदवीधर- दोन जागा पैकी एक खुला व एक इतर मागास प्रवर्ग राखीव उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

निवडणूक रिंगणात असलेले नाशिकचे उमेदवार असे-

व्‍यवस्‍थापन प्रतिनिधी गटातील अधिसभा सदस्‍य डॉ.अपूर्व हिरे यांच्‍यासह प्राचार्य गटातून डॉ.राजेंद्र भांबर, डॉ.संपतराव काळे यांचा समावेश आहे. पदवीधर गटातून ॲड.बाकेराव बस्‍ते आणि सागर वैद्य.

विखे-पाटलांसोबत हिरेंची होणार लढत

व्‍यवस्‍थापन प्रतिनिधी म्‍हणून अधिसभेवर असलेले डॉ.अपूर्व हिरे तसेच मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील खुल्‍या गटातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे नाशिक व नगर येथील या दोन हेव्‍हीवेट सदस्‍यांना एकमेकांचा सामना करावा लागणार आहे.

SPPU university
Jindal Fire Case : जिंदाल पॉली फिल्म कंपनीतील दुर्घटनेप्रकरणी विरोधक आक्रमक; मालकावर कारवाई सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.