Nashik News: सिडकोत घरात आढळली कोब्रा जातीची तब्बल 5 पिल्ले!

Snake Puppies found in a house at Kewell Park.
Snake Puppies found in a house at Kewell Park.esakal
Updated on

Nashik News : सिडकोतील केवल पार्क परिसरात एका घरात कोब्रा जातीची पाच पिल्ले आढळली असून, सर्पमित्राने त्यांना पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सिडकोतील अष्टविनायकनगर, केवल पार्क येथे गजानन ताथे यांना आपल्या घरात सापाची पिल्ले असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तत्काळ ही बाब सर्पमित्र तुषार गोसावी यांना कळविली. त्यांनी मोठ्या शिताफीने ही पिल्ले पकडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. (5 cobra cubs found in cidco house Nashik News)

सर्पमित्र गोसावी ताथे यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना चेंबरजवळ डगमध्ये नागीण दिसली. मात्र तिच्यापर्यंत पोचण्यापूर्वी घुशीने केलेल्या बिळाच्या मार्गाने ती निघून झाली. शोध घेत असताना टॉयलेटच्या जाळीच्या मार्गाने किचनमध्येही शिरलेली काही पिल्ले आढळली.

नंतर दुसऱ्या दिवशी बेडरूममध्ये काही पिल्ले मिळाली. एकूण पाच पिल्ले पकडण्यात आले. कोब्रा जातीच्या पिल्ले आहेत. नागीण एकावेळी दहा ते बारा पिल्ले देते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Snake Puppies found in a house at Kewell Park.
Nashik News: POP गणेशमूर्ती विकणारच; NMC आयुक्तांची बंदी झुगारून विक्रेत्यांचा निर्धार

त्यामुळे आणखी काही पिल्ले आहेत का, याचा शोध घ्यावा लागेल, असे सर्पमित्राने सांगितले. अंडी देऊन नागीण तेथून निघून गेली असली तरी ती एक ते दीड महिने पिल्लांची रखवाली करीत असते.

"पावसाळ्यात बिळात पाणी गेल्याने साप बिळातून बाहेर येत असतात. त्याचप्रमाणे ते भक्षाच्याही शोधात असतात. साप घरात येऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करीत प्रत्येकाने पुरेशी खबरदारी घ्यावी. संशयास्पद काही आढळून आल्यास तत्काळ सर्पमित्रांना कळवावे."

- तुषार गोसावी, सर्पमित्र

Snake Puppies found in a house at Kewell Park.
Gram Swachhta Survey: ‘ग्राम स्वच्छता’ सर्वेक्षणास प्रारंभ! जिल्ह्यातील 3 उत्कृष्ट ग्रामपंचायतींची होणार निवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.