Nashik Crime : पत्नीच्या मारेकऱ्याला 5 दिवसांची कोठडी

Husband killed wife
Husband killed wifeSakal
Updated on

नाशिक : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिचा खून (Murder) करणाऱ्या पतीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. स्वत:च खून करून औरंगाबादच्या वाळूज पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला अज्ञात व्यक्तीने पत्नीचा नाशिकमध्ये खून केल्याची माहिती दिली होती. अंबड पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यासाठी (Crime) वापरलेला नाल्यात फेकलेला चाकूही हस्तगत करण्यात आला. (5 days remand for wifes killer Nashik Crime News)

अंबडच्या चुंचाळे शिवारातील दत्तनगरमध्ये संशयित सचिन पवार याने पत्नी संगीताचा रविवारी (ता. २६) सायंकाळी खून केला होता. मृत संगीताचे औरंगाबादमध्ये राहत असलेल्या ठिकाणी अनैतिक संबंध होते, यापूर्वी अनेकदा संगीता घर सोडून निघूनही गेलेली आहे. याबाबत वाळूज पोलिसांत बेपत्ताची नोंदही आहे. संगीताच्या या सततच्या प्रकाराला वैतागून सचिन पाच दिवसांपूर्वी तिला नाशिकला घेऊन आला. रविवारी त्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर तो औरंगाबादला निघून गेला.

औरंगाबादला पोचल्यानंतर त्याने संगीताचा बेपत्ता तपास करणाऱ्या पोलिसाला फोन करून, पत्नीला अज्ञातांनी मारल्याचे सांगितले. ती माहिती वाळूज पोलिसांनी नाशिकच्या अंबड पोलिसांना दिली. संगीताचा खून झाल्याची खात्री पटल्यानंतर अंबड पोलिस संशयित सचिनला तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी नाशिकहून औरंगाबादला गेले. त्याचा ताबा घेतल्यानंतर त्याने प्राथमिक चौकशीतही अज्ञात व्यक्तीने त्याच्या पत्नीचा खून केल्याचे सांगितले; परंतु पोलिसी खाक्या दाखविताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर, खुनाचा उलगडा झाल्याचे अंबडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांनी सांगितले.

Husband killed wife
शहरातून चोरी झालेल्या कारचा मालेगावच्या जबरी चोरीत वापर

तिचे छत्रच हरपले...

पवार दांपत्याला दोन वर्षांची मुलगी आहे. संगीता मुलीला सचिन व त्याच्या आई-वडिलांकडे सोडून कधीही निघून जायची. मात्र, आज या चिमुरडीची आई देवाघरी, तर बाप पोलिस कोठडीत गेल्याने तिचे छत्रच हरपले आहे. सध्या ही मुलगी सचिनचे आई-वडील व लहान भावाकडे आहे.

Husband killed wife
Nashik : 16 बालकांवर मुंबईत हृदयशस्त्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.