Nashik News : सिन्नर तालुक्यात भगवान बुद्धांच्या 5 मूर्तींची होणार स्थापना

Gautam Buddha
Gautam Buddhaesakal
Updated on

Nashik News : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, बीएमए ग्रुप नाशिक यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच, भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १२० विहारांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या १२० मूर्तींची एकाच वेळी स्थापन केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये श्रम शिबिर होणार आहे. (5 idols of Lord Buddha will installed in Sinnar taluka Nashik News)

तालुक्यात सायाळे, पंचाळे, गुळवंच, आडवाडी, पांढुर्ली या गावातील विहारांमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार असल्याने या गावांमध्ये शिबिरास सुरवात करण्यात आली. या शिबिरात पाच गावातील प्रत्येकी पाच शिबिरार्थींनी भाग घेतला असून ते श्रामनेर दीक्षा घेत धम्मातील विनयाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. श्रामनेर संघाला भदंत बुद्धभूषण मार्गदर्शन करत असून त्यांच्याकडून विनयाचे पाठ करून घेत आहे.

या शिबिराचा समारोप २ मेस नाशिक शहरात होणार असून तपोवन ते गोल्फक्लब पर्यंत रॅली, विविध सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. यावेळी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Gautam Buddha
Market Committee Election Result: कळवणला शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व! 18 पैकी 15 जागा जिंकत सत्ता अबाधित

कार्यक्रम यशस्वितेसाठी बीएमए ग्रुपचे मोहन अढांगळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष के. के. बच्छाव, उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसाठ, भारतीय बौद्ध महासभेचे सिन्नर तालुकाध्यक्ष बबनराव जगताप, नाशिक जिल्हा सचिव संतोष शिरसाठ, तालुका सरचिटणीस कैलास रूपवते, पोपटराव भालेराव, जगन्नाथ जारे, दिलीप गोरे, शंकर गोरे, नरेश गोरे, अविनाश जगताप भारत वाघ आदी प्रयत्न करीत आहेत.

श्रामनेर संघाची आज अभिवादन यात्रा

श्रामनेर संघ २३ एप्रिल ते २ मे या कालावधीत तालुक्यातील पाचही गावांतील विहारांमध्ये धम्माचा प्रचार, प्रसार करत आहे.

सिन्नर शहरात शनिवारी (ता.२९) दुपारी चारला शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी श्रामनेर संघाची अभिवादन यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन सिन्नर तालुका शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Gautam Buddha
Market Committee Election Result: देवळा बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलची सत्ता!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.