Shahpur Accident Case: शहापूर अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख

 Dada Bhuse
Dada Bhuseesakal
Updated on

Shahpur Accident Case : शहापूर येथे समृद्धी महामार्गावरील पुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळल्याने १७ कामगारांचा मृत्यू झाला. या मृत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत शासनातर्फे दिली जाणार आहे.

जखमींवरील उपचारांचा खर्च शासन करणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. (5 lakh each to heirs of Shahpur accident victims nashik)

 Dada Bhuse
Samruddhi Mahamarg Accident: मोदींच्या कार्यक्रमानंतर शिंदे पोहचले थेट शहापुरातील दुर्घटनास्थळी, चौकशीचे दिले आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत श्री. भुसे बोलत होते. ते म्हणाले, की या महामार्गावरील पुलाचे काम सिंगापूरची कंपनी करीत आहे. आतापर्यंत ९७ स्पेनचे काम पूर्ण झाले असून, पुढील १६ स्पेनचे काम सुरू होते.

त्यादरम्यान हा अपघात झाला. चौकशीतून नेमका कशामुळे अपघात झाला, हे स्पष्ट होईलच. परंतु, या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १७ कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनातर्फे देण्यात येणार आहे.

तांत्रिक चुकीतून अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. परंतु, चौकशीसाठी काही वेळ लागेल, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

 Dada Bhuse
Samruddhi Accident: शहापूर दुर्घटनेत 20 मृत कामगारांची नावे आली समोर; दुर्घटनेबाबत CM शिंदेंनी दिल्या महत्वाच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.