Nashik Fraud Crime : सायबर पोलिसिंगमुळे मिळाले 5 लाख परत

Cyber Fraud
Cyber Fraudesakal
Updated on

नाशिक : मुलीच्या लग्नांसाठी एसबीआय बँकेत फिक्स डिपॉझिट केलेल्या ७ लाखांच्या रकमेवर अज्ञात भामट्याने ओडी लोन करून ५ लाख २५ हजारांचे लोन (Loan) मंजूर केले आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग केले. (5 lakh recovered due to cyber police fraud took an OD loan on FD nashik news)

मात्र तक्रारदाराने वेळीच सायबर पोलिसांची मदत घेतल्याने सुमारे ५ लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात यश आले आहे.

भरत वामन कासार (रा. अशोकनगर, सातपूर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी मुलीच्या लग्नासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत ७ लाख रुपयांची एफडी केलेली होती. गेल्या बुधवारी (ता.२२) सायंकाळी कासार यांच्या मोबाईलवर अज्ञात भामट्याने पॅनकार्ड व्हेरिफिकेशनसाठी एक टेक्स मेसेजवरून लिंक पाठविली.

त्यावरून कासार यांना त्याने ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर बँक खाते व नेट बँकिंग आयडी, पासवर्डची माहिती भरल्याने बँकेची सगळी माहिती भामट्याकडे गेली. कासार यांच्या मोबाईलचा अक्सेस भामट्याने घेतल्याने त्यावर आलेला ओटीपीही त्याला समजला.

त्याचा वापर करून भामट्याने कासार यांच्या एफडीवर ५ लाख २५ हजार रुपयांचे ओडी लोन मंजूर करून घेतले आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्गही केले. त्यासंदर्भाती मेसेसज कासार याच्या मोबाईल आले. ते मेसेसज पाहून ते हादरले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Cyber Fraud
Nashik News : द्वारका परिसरात उच्च दाबाची वीजतार कोसळली!

बँकेत घेतली धाव

आलेले मेसेसजमुळे हादरलेले कासार गुरुवारी (ता.२३) सकाळी एसबीआय बँकेच्या मॅनेजरकडे गेले. त्यांनी कासार यांना फसवणूक झाल्याचे सांगत तात्काळ सायबर पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे, कासार यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले आणि हकीकत सांगितली.

सायबर पोलिसांकडून तात्काळ कारवाई

पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष काळे यांनी तात्काळ संबंधित बँकांना ई-मेल केले. नोडल अधिकार्यांशी फोनद्वारे संपर्क साधला. सायबर पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा, ॲक्सिस बँकांमध्ये जाऊन संबंधित खात्यांची माहिती घेतली.

तसेच, तांत्रिक विश्लेषणानुसार वर्ग केलेले पैसे कोठे जाऊ शकतात, त्यानुसार संबंधित ठिकाणी तात्काळ इ-मेल केले. यामुळे शुक्रवारी (ता. २४) कासार यांच्या खात्यावर ४ लाख ९९ हजार ९९९ रुपये परत मिळविण्यात सायबर पोलिसांना यश आले.

Cyber Fraud
Nashik Crime News : कॉलेजरोड परिसरात वीजचोरीचा पर्दाफाश गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल

यांनी केली कामगिरी

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, उपनिरीक्षक दानिश मन्सुरी, संतोष काळे, किरण जाधव यांनी सदरची कामगिरी बजावली.

यावर साधावा संपर्क

ऑनलाईन फसवणूक झाल्यास संबंधितांनी तात्काळ हेल्पलाईन १९३०, https://cybercrime.gov.in यावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. ओटीपी देऊन फसवणूक झाल्यास १५५२६० वा नाशिक सायबर पोलीस ठाणे ०२५३२३०५२२६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Cyber Fraud
Nashik Kala Katta | कलेची उपासना म्हणजे ध्यानमग्नेतील योगसाधनाच : वेणूनादाचे उपासक मोहन उपासनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.