नाशिक : बँकेच्या नावाने मेसेजद्वारे लिंक पाठवून त्याद्वारे संशयिताने एकाच्या बँक खात्यातून पाच लाख रुपये वर्ग करून घेत ऑनलाइन गंडा घातला. (5 lakhs fraud under name of PAN Card update Nashik Latest Crime News)
याप्रकरणी सतीश रामचंद्र कंकरेज (रा. कोणार्कनगर) यांच्या फिर्यादीनुसार, पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने अज्ञात संशयिताने कंकरेज यांना लिंक पाठविली. लिंकवर क्लिक केल्यानंतर काही वेळानंतर त्यांच्या बँक खात्यातील ५ लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यात वर्ग झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याआधीही ऑनलाइन पद्धतीने भामट्यांनी शहरातील नागरिकांना गंडा घातला आहे. मोबाईलवर विविध स्वरूपाचे मेसेज पाठवून त्यातील लिंकद्वारे फसवणूक होत असून, शिक्षित व्यक्तीही त्यात बळी ठरत असल्याने सायबर पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. दरम्यान, कंकरेज यांच्या फिर्यादीनुसार सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक, फसवणुकीची रक्कम वर्ग झालेल्या खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.