Nashik News : शहरात आत्महत्त्यांचे सत्र; 5 जणांनी संपविली जीवनयात्रा

शहर परिसरातील विविध भागांमध्ये पाच जणांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविली.
suicide
suicide esakal
Updated on

Nashik News : शहर परिसरातील विविध भागांमध्ये पाच जणांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविली. यात एका महिलेने आजारपणाच्या नैराश्यातून तर एका युवकाने नोकरी गमाविल्याने आजारी आईचा उपचार कसा करायचा या विवंचनेतून आत्महत्त्या केली आहे.

देवळाली कॅम्प परिसरात नातलगांच्या घरी आलेल्या महिलेने आत्महत्या केली. (5 people commit suicide in city in one day nashik news)

मानसिक आजारावर उपचारासाठी ती नातलगाकडे मुक्कामी असताना विषप्राशन करीत आत्महत्त्या केली. सुनंदा विलास जाधव (४६, रा. शिंदे, नाशिक, सध्या रा. विजयनगर, भगूर) असे मृत महिलेचे नाव आहे. सुनंदा या काही दिवसांपासून भगूर येथील नातलगांकडे वास्तव्यास होत्या.

काही महिन्यांपासून मानसिक आजारासंदर्भात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच त्यांनी सोमवारी (ता. १५) रात्री एक वाजता विषारी आौषध प्राशन करीत जीवन संपविले. मृत सुनंदा यांचे पतीचे यापूर्वीच निधन झाले असून दोन्ही मुलींचे विवाह झालेला असून एक मुलगा आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट झाले नसून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, हवालदार राजेंद्र गुंजाळ तपास करत आहेत.

दुसर्या घटनेत बेपत्ता १६ वर्षीय मुलाचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. अमोल दत्तु शेलार (१६, रा. श्रमनगर रस्ता, उपनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. अमोल हा काही दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी त्याचे अपहरण केल्याची नोंद पोलिसात होती. मात्र, त्याचा मृतदेह सोमवारी (ता. १५) दुपारी आडगाव हद्दीतील गोदातिरी नंदीनी संगमाजवळील मंडलिक मळ्यालगतच्या नदीपात्रात आढळून आला.

suicide
Nashik News : पतंग काढताना विजेच्या धक्क्याने शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

त्याच्या आत्महत्येचे कारण कळले नसून आडगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून, हवालदार एस. जी. डापसे तपास करीत आहेत. मखमलाबाद गावातील राजवाडा परिसरात राहणाऱ्या एका मुजराने मद्याच्या व्यसनातून विष पिऊन आत्महत्या केली. सुनिल विठ्ठल पारधी असे मृताचे नाव आहे. ते पत्नी व मुलांसह माेलमजुरी करुन उदरनिर्वाह करत हाेते. त्यांनी सोमवारी (ता १५) सकाळी आत्महत्या केली.

याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून, हवालदार संजय गवारे करीत आहेत. तर, सिडकोतील महाकाली चौकात राहणाऱ्या ४० वर्षीय प्रशांत धोंडीराम आहेर यांनी सोमवारी (ता. १५) सायंकाळी सहा वाजेपूर्वी किचनमध्ये गळफास घेत आत्महत्त्या केली असून, यामागील कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी अंबड पाेलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून, हवालदार परदेशी तपास करत आहेत.

नोकरी गमावल्याने आत्महत्त्या

खासगी नोकरी गमावली तर दुसरीकडे आजारी आईच्या उपचारांकडे दुर्लक्ष होत असल्याने एका ३५ वर्षीय युवकाने विषप्राशन करुन जीवन संपविले. संदीप गणेश पांडे (रा. शिवाजीनगर, सातपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. संदीप यांची नोकरी गेली होती. त्यातच संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राहणाऱ्या आजारी आईला भेटण्यास वेळोवेळी जाता येत नव्हते.

पत्नीदेखील खासगी नोकरी करते, त्यांना अपत्य नव्हते. मात्र, आईला अर्धांगवायूचा झटका आल्याने ती आजारी व दुसरीकडे नोकरी गेल्याने मानसिक तणावाखाली त्याने विष पिऊन घरात आत्महत्या केल्याचे समोर येते आहे.. याबाबत गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद केली असून पोलिस नाईक गणेश हिंडे तपास करीत आहेत.

suicide
Nashik News: मैत्री जपली पण जीव मात्र गमावला! मित्रांच्या वडिलांचा डोळ्यांदेखत मृत्यू झाल्याने युवकाने सोडले प्राण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.