Inspirational News : ठाणगावचे 5 जण एकाचवेळी झाले पोलिस!

Sarpanch Namdev Shinde congratulating Bhumiputra Saadhan Dond, Santosh Shinde, Archana Shinde, Sonali Shinde on their selection in the police force.
Sarpanch Namdev Shinde congratulating Bhumiputra Saadhan Dond, Santosh Shinde, Archana Shinde, Sonali Shinde on their selection in the police force. esakal
Updated on

दत्तात्रेय खुळे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्यात सुरू असलेल्या पोलिस भरतीत ठाणगाव (ता. सिन्नर) येथील पाच जणांची निवड झाल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यात दोन तरुणी व तीन युवकांचा समावेश आहे. (5 people from Thangaon become police at same time nashik news)

या सर्व तरुण परीक्षार्थी आपल्या मेहनतीने, अभ्यासाच्या चिकाटीने खडतर परिश्रमातून खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत हे यश मिळविले आहे. याबद्दल ठाणगाव ग्रामपंचायतीतर्फे व ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

समाधान तात्याबा दोंड यांची ठाणे शहर पोलिस दलात व संतोष निवृत्ती शिंदे, अर्चना श्रीकृष्ण गुंड, सोनाली शंकर शिंदे या तिघांची घाटकोपर लोहमार्ग पोलिस दलात निवड झाली आहे. या चार जणांचा नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सत्कारावेळी सर्व यशस्वी उमेदवारांचे नागरी सत्काराने मने भरून आली.

अध्यक्षस्थानी सरपंच नामदेव शिंदे होते. उपसरपंच विलास मोरे, आदिनाथ शिंदे, सतीश भोर, ग्रामपंचायत सदस्य नामदेव फोडसे, दिलीप कर्डिले, मोहन आव्हाड उपस्थित होते. माजी उपसरपंच शेखर कर्डिले यांनी यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतानाच, गावातील सर्व बेरोजगार तरुण-तरुणींनी या सर्व यशस्वी उमेदवारांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये परिश्रम घेऊन यशस्वी व्हावे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Sarpanch Namdev Shinde congratulating Bhumiputra Saadhan Dond, Santosh Shinde, Archana Shinde, Sonali Shinde on their selection in the police force.
Nashik News : राज्यात आकांक्षित शहरात जिल्ह्यातील 3 शहर!

ज्या उमेदवारांना या परीक्षांमध्ये यश मिळणार नाही त्यांनी खचून न जाता प्रयत्न करावेत, व्यवसायाकडेही वळावे असे आवाहन करण्यात आले. आदिनाथ शिंदे, सतीश भोर, रामचंद्र शिंदे, प्रतीक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

सरपंच नामदेव शिंदे यांनी गावातील सर्व बेरोजगार तरुणांनी मोबाईलचा वापर कुठेतरी कमी करून अतिशय जिद्दीने स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, व्यवसाय करावा, कुठेतरी यशस्वी व्हावे आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवावा, सत्कार करण्याचे प्रमुख कारण यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन तर नक्कीच आहे, परंतु इतरही सराव करणाऱ्या उमेदवारांसाठी प्रेरणा मिळावी आणि त्यांनादेखील यशस्वी व्हावे, गावचे नाव उज्वल करावे असे सांगितले. शेखर कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.

एकाच वेळी चार तरुण पोलिस दलात दाखल होत असल्याने कौतुक सुरू आहे. त्यात अर्चना गुंड, सोनाली शिंदे या मुलींच्या यशाबद्दल ठाणगाव परिसरातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Sarpanch Namdev Shinde congratulating Bhumiputra Saadhan Dond, Santosh Shinde, Archana Shinde, Sonali Shinde on their selection in the police force.
Inspirational News : कल्याणीच्या कष्ट, मेहनत अन जिद्दीचे झाले कल्याण! कुटूंबियांसह ग्रामस्थांचा जल्लोष..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()