नाशिकच्या 'बॉश' कंपनीतील चोरी प्रकरणी ५ संशयितांना अटक

bosch company
bosch company Google
Updated on


सातपूर : उद्योग क्षेत्रात मोठे नाव असलेल्या नाशिकमधील बॉश कंपनीतील साडेआठ लाख रुपयांच्या पार्ट चोरीप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे, अशी माहिती सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांनी दिली. चोरीमुळे व्यवस्थापनासह कामगार व ठेकेदार संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. (5 suspects arrested in bosch company theft case in nashik)


कॅन्टीनमध्ये काम करणारे ठेकेदार कामगार संजय अशोक रोकडे (वय ३०, रा. लोकमान्यनगर, सिडको) व कमलेश सुरेश तिरमले (३५, रा. विश्वासनगर, अशोकनगर) या दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यात पुन्हा राजेश शिरसाट, दिगंबर शिवाजी गुंबाडे, महेश रमेश चिंचकर यांना अटक केली आहे. या प्रकरणात संशयितांची संख्या पाच झाली आहे.

bosch company
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

12 मे रोजी कंपनीचे वरीष्ठ एचआर व्यवस्थापक श्रीकांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्नुयादी नुसार भंगार उलचणारे, स्वच्छता सह ओजीटी, काही कायम कामगार यांच्या संगनमताने गेल्या आनेक महीन्यांपासून विविध मार्गाने कंपनीतील पार्ट चोरी झाल्याचा प्रकार कंपनीच्या ऑडीट मध्ये लक्षात आल्याने व्यवस्थापनाने कंपनी अंतर्गत चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलिसांची मदत घेतली यात पोलिसांनी अनेक ठेकेदार कामगार व ज्या विभागामधून हे पार्ट कंपनीबाहेर गेले त्या विभागातील अधिकारी, कर्मचारी, ओजीटी व कायम कामगार यांची पोलिसांनी चौकशी केली. यात कॅन्टीनमध्ये काम करणारे ठेकेदार कामगार संजय अशोक रोकडे वय वर्षे 30 ( रा. लोकमान्य नगर, सिडको) व कमलेश सुरेश तिरमले, वय 35 (रा. विस्वास नगर, अशोक नगर, सातपूर) असे दोन संशयितांना अटक करुन त्यांना न्यायालयात हजर केले आसता 16 मे पर्यन्त पोलिस कोठडी सुनावली होती. पुढे अजून राजेश शिलाजी शिरसाठ, डीगंबर शिवाजी गुबांडे. महेश रमेश चिंचकर यांंना देखाल अटक झाल्याने आतापर्यंत एकूण पाच संशयितांना अटक करण्यात आले आहे.

(5 suspects arrested in bosch company theft case in nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.