World Post Day: 5 हजार विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र; टपाल दिनानिमित्त क्वालिटी सिटी नाशिकच्या माध्यमातून उपक्रम

School students participating in letter writing activities.
School students participating in letter writing activities.esakal
Updated on

Nashik News : मोबाईल, टीव्ही स्क्रीनने व्यापून टाकलेल्या मुलांच्या भावविश्वातून लेखन-वाचनाचे झपाट्याने घटणारे प्रमाण आणि त्यातही संपर्क क्रांतीमुळे केवळ मुलेच नव्हे मोठ्यांनाही विस्मृतीत जाऊ पाहणाऱ्या पत्र या संकल्पनेची अनुभूती नाशिकमधील तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी घेतली.(5 thousand students write letter to Prime Minister on post day nashik news)

९ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त देशातली पहिली क्वालिटी सिटी म्हणून नाशिकची निवड झाल्याबद्दल आभार व्यक्त करतानाच स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकास याबाबतीत आपला संकल्प व्यक्त करणारे पोस्टकार्ड या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले.

क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या समन्वयातून हा उपक्रम पार पडला. नागरिकांना टपाल सेवेबाबत जागरूक करणे, या सेवेचे बदलत्या काळातील महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने टपाल दिनी विविध उपक्रम राबविले जातात. यंदाचा टपाल दिन ‘विश्वासासाठी एकत्र: सुरक्षित आणि परस्परपूरक भविष्यासाठी सहकार्य’ या संकल्पनेवर आधारित होता.

क्वालिटी सिटी नाशिक अभियानदेखील याच संकल्पनेला अनुकूल असल्याने त्याची माहिती टपाल दिनानिमित्त शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणे व त्यांना या चळवळीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आखण्यात आला होता.

School students participating in letter writing activities.
Nashik Onion News : उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट; सुमारे सव्वा ते दीड लाख क्षेत्रावरच लागवडीचा अंदाज

नाशिकला पहिली क्वालिटी म्हणून मानांकित करण्यासाठी निवडल्याबद्दल पंतप्रधान आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांचे आभार मानणे, या अभियानाच्या यशस्वितेसाठीच संकल्प व्यक्त करणे, यासाठी विद्यार्थांना पोस्टकार्ड लिहिण्यास सांगण्यात आले होते.

शहराला स्वच्छ आणि सुंदर, कौशल्यपूर्ण ठेवत, शिक्षणाचा दर्जा उत्तम राखत आणि स्वतःला व इतरांना शालाबाह्य होऊ न देत नाशिकला क्वालिटी सिटी बनविण्याचा निर्धार या पोस्टकार्डाद्वारे विद्यार्थ्यांनी करावा, असाही प्रयत्न होता.

त्याचबरोबर घर, परिसर, शाळा आणि शहर स्वच्छ व सिंगल यूज प्लॅस्टिकमुक्त ठेवण्यासाठी काय उपक्रम राबविणार आणि काय संकल्प घेणार याबाबतही लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

School students participating in letter writing activities.
Nashik News : बाळहिरडाप्रश्नी 19 ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक; किसान सभेचे ठिय्या आंदोलन मागे

विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी अशा भाषांमध्ये हे पोस्टकार्ड लिहिले. काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितेच्या तर काहींनी चित्रांच्या माध्यमातून आपल्या भावना सर्जनशीलपणे व्यक्त केल्या. नाशिक जीपीओचे पोस्टमास्तर डॉ. संदेश बैरागी, पोस्टाचे विपणन अधिकारी विठ्ठल पोटे यांच्या उपस्थितीत पोस्टमनकडे पोस्टकार्ड सुपूर्द करण्यात आली.

या शाळा सहभागी

- महापालिकेच्या शाळा, मराठा विद्या प्रसारक समाजाची होरायझन स्कूल, अशोका स्कूल, इस्पॅलियर हेरिटेज, एक्सपिरीमेंटल स्कूल, स्वामी विवेकानंद सोसायटीच्या इंदिरानगर, मोरवाडी शाळा, आर. पी. विद्यालय.

School students participating in letter writing activities.
Nashik News : हरसूलच्या जंगलात लाकडाच्या लगद्याचे घरटे; ‘लेसर बॅन्डेड हॉर्नेट’ माशीची निर्मिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.