जुने नाशिक : मुंबई आग्रा रोड वडाळा नाका परिसरातील बेकायदेशीर कुंटण खाना मुंबई नाका पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आला. ३ संशयितांना ताब्यात घेतले. ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. (5 women prostitues rescued from unauthorized place in Wadala Naka area Nashik Crime News)
वडाळा नाका परिसरातील एका सोसायटीच्या तळमजल्यात अनैतिक देहविक्री व्यवसाय सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक गुन्हे चंद्रकांत अहिरे यांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार मुंबई नाका गुन्हेशोध पथकाचे श्री. सोनार, देविदास गाढवे, श्री. सानप, आकाश सोनवणे, समीर शेख, आप्पा पानवळ, अनिल आव्हाड, श्री. टेमकर, श्री. नाकोडे, श्री. जाधव, श्री. गुंजाळ, श्री. सोनवणे, श्री.पगार यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. दरम्यान पोलीस पथक परिसरात सापळा रचून होते.
बनावट ग्राहकाकडून इशारा मिळताच पथकाने छापा मारला. त्याठिकाणी अनधिकृतितरित्या देहविक्री व्यापार सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत संशयित कैलास गणपत दांगी (वय.४३,रा. मूळ झारखंड), विनय भुवनेश्वर दांगी (वय.४०,रा. मूळ झारखंड), प्रकाश नामदेव राऊत (वय.४५,रा. जेलरोड) अशा तिघांना अटक केली.
तर ५ पीडित महिलांची त्यांच्या ताब्यातून सुटका केली. कुंटणखाण्याचा मालक राज पाटील उर्फ राहुल कापडणे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी त्याठिकाणाहून ९ मोबाईल जप्त केले.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरात अश्या प्रकारच्या देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर आणि मसाज पार्लच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार नाशिक शहर पोलिसांकडून कडक कार्यवाई केली जात आहे. यानिमित्ताने मुंबई नाका पोलिसांनी अशी कार्यवाई केली.
प्रतिष्ठित भागात अशाप्रकारे देहविक्री व्यापार सुरू असल्याचे वृत्त परिसरात पसरतात परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. ज्याठिकाणी व्यापार सुरू होता तेथून हाकेच्या अंतरावर एका बाजूस मुंबई नाका पोलीस ठाणे तर दुसऱ्या बाजूस मुंबई नाका पोलीस चौकी आहे. दोघांच्या आत अशाप्रकारे बेकायदेशीर रित्या देहविक्री व्यापार सुरू असल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.