Nashik : इंधन दर कमी झाल्याबद्दल खाद्य पदार्थांवर 50 टक्के सूट

Reduced Rate of Fuel
Reduced Rate of Fuelesakal
Updated on

सिडको (जि. नाशिक) : केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल, डिझेलचे दर कमी (Petrol Diesel Reduced Rate) करत जनतेला दिलासा दिला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या या निर्णयाचा सिडको चौपाटीवर असलेल्या चायनीज डॉट कॉमचे संचालक आणि पंतप्रधानांचे फॅन असलेल्या राहुल गणोरे यांनी ग्राहकांना पन्नास टक्के सूट (Discount) देत आपला आनंद साजरा केला. (50 per cent discount on food items due to reduction in fuel rates Nashik News)

Reduced Rate of Fuel
वीजेचा धक्का बसल्याने महिलेचा मृत्यू

शनिवारी (ता. २१) आणि रविवारी (ता. २२) मिळालेल्या या ऑफर्सचा ग्राहकांनीदेखील मनमुराद आनंद लुटला. श्री. गणोरे यांनी सांगितले, की इंधनासोबत उज्ज्वला घरगुती गॅस सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी देऊन सामान्य जनतेला पंतप्रधान मोदी यांनी मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी उचललेले हे मोठे पाऊल आहे. सर्व देशवासीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. निर्णयामुळे निश्चितच महागाई कमी होण्यास मदत होणार आहे. सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. या आनंदात मी सहभागी होत आहे. हाच आनंद जनतेसोबत साजरा करण्यासाठी व्हेज, नॉनव्हेज चायनीज स्टॉलवर प्रत्येक पदार्थावर ५० टक्के डिस्काउंट दिली आहे. अचानक मिळालेल्या या डिस्काउंटचा ग्राहकांनीदेखील मनमुराद आनंद लुटत येथील पदार्थांवर मनसोक्त ताव मारला.

Reduced Rate of Fuel
नाशिक : आगीच्या घटनेमुळे परिवहन विभाग ॲक्शन मोडवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.