Nashik Rain Crisis : जिल्ह्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नुकसान भरपाईसाठी तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात ५० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, कृषी विभागामार्फत सोमवारी (ता. २८) अंतिम अहवाल सादर करण्यात येईल. (50 percent damage survey complete final report from the Agriculture Department to Collector on Monday nashik)
पावसाळा सुरू होऊन तीन महिने संपण्यावर आले तरी जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात खरिपाची ९२ टक्के पेरणी झाली. अशा परिस्थितीत सलग २१ दिवस झाले तरी पाऊस न झालेल्या भागाचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येत आहे.
कृषी विभागाचे अधिकारी व शेतकऱ्यांचा पीकविमा उतरविलेल्या ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी थेट बांधावर जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. जिल्ह्यातील पाच लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा उतरवला आहे.
त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये एकूण १२१ महसूल मंडळे आहेत. प्रत्येक मंडळातील निवडक गावांमध्ये जाऊन तेथील पिकांची पाहणी करून ऑनलाइन स्वरूपात त्याची नोंद केली जाते.
कृषी विभागामार्फत त्याला ‘मीड डे सर्वे’ म्हटले जाते. बहुतांश महसूल मंडळाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने तीन तालुक्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये आता सर्वेक्षण सुरू असून, येत्या दोन दिवसांत ते पूर्ण होईल.
अशी मिळेल भरपाई
कृषी विभाग व इन्शुरन्स कंपनीमार्फत सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर अंतिम अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल. पीकविमा कंपनी पात्र शेतकऱ्यांचे मागील सात वर्षांची वार्षिक उत्पन्नाची सरासरी लक्षात घेऊन भरपाई निश्चित करेल.
त्यापैकी २५ टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. एका गटात दोन, तीन शेतकऱ्यांची नावे असतील तर उर्वरित शेतकऱ्यांची संमती घेणे बंधनकारक असणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अशीही ‘जिरवा-जिरवी’
पीकविमा कंपनीमार्फत भरपाई मिळण्यापूर्वीच भाऊबंदकी उफाळून आली आहे. एका गटाच्या सातबारा उताऱ्यावर दोन- तीन भावांची नावे आहेत. त्यापैकी एकाने पीकविमा उतरविला.
उर्वरित भाऊ त्याला मदत देऊ नका म्हणून पीकविमा कंपनीशी संपर्क साधत आहेत. दुष्काळाच्या संकट काळापेक्षाही भाऊबंदकी वरचढ ठरत असल्याचे दिसते.
"जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वत: कुठल्याही कंपनीशी संपर्क साधू नये. पीकविमा कंपनी व कृषी विभागाचे कर्मचारी हे संयुक्तरीत्या सर्वे करीत आहेत. प्रत्येक मंडळाचा सर्वे पूर्ण झाल्यावर पात्र शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल." - जगदीश पाटील, कृषी उपसंचालक, नाशिक विभाग
तालुकानिहाय झालेल्या पेरण्या
मालेगाव : ९९.४७
बागलाण : १०६.६३
कळवण : ९६.८२
देवळा : ९४.८३
नांदगाव : ९२.१४
सुरगाणा : ७६.९५
नाशिक : ७७.८८
त्र्यंबकेश्वर : ८५.५६
दिंडोरी : ८१.७३
इगतपुरी : ८७.१२
पेठ : ८७.६७
निफाड : ९९.१९
सिन्नर : ५१.९४
येवला : १०७.२
चांदवड : ९८.२३
एकूण : ९१.५८ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.