नाशिक : महापालिकेच्या ६२ व्यापारी संकुलातील २९४४ गाळेधारकांना नोटीस बजावली जाणार आहे. यातील ५० टक्के गाळेधारक थकबाकीदार असून त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यास कारवाई केली जाणार आहे. (50 Percent Garbage Holder Arrears not paid tax confiscation action Nashik NMC News)
शहरात महापालिकेचे ६२ व्यापारी संकुल आहे. यात २९४४ गाळेधारक आहे. यातील ५६ व्यापारी संकुलातील १७३१ गाड्यांची मदत २०१५ मध्ये संपली. उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयांमध्ये महापालिकेच्या मिळकतींवर रेडीरेकनरच्या आठ टक्के दराने दर आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात दर अदा करणे शक्य नसल्याने गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान न्यायालयाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. या दरम्यान थकबाकी वसुली करण्यासाठी महापालिकेच्या विविध कर विभागाने पावले उचलली आहेत. २९४४ गाळेधारकांना नोटीस वाजविण्यात आली आहे.
दरम्यान, अपेक्षित वसुली करण्यासाठी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी ही नागरिक सुविधा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विहित कालावधीमध्ये थकबाकी अदा न केल्यास गाळे जप्त केले जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.