Nashik Cyber Crime : वीज बिलाची फेक लिंक पडली महागात; 50 हजारांचा ऑनलाइन गंडा

महावितरणच्या नावे व्हाट्सअप आलेला बनावट संदेश व त्यासोबत असलेली लिंक सिन्नर तालुक्यातील दोडी येथील एका तरुणाला सुमारे पन्नास हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालून गेली.
crime
crime esakal
Updated on

सिन्नर : तुमच्या घरचे विज बिल भरलेले नाही. मुदत टळून गेली आहे. कनेक्शन कापण्याआधी तुमचे विज बिल खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तात्काळ भरणा करा.

असा महावितरणच्या नावे व्हाट्सअप आलेला बनावट संदेश व त्यासोबत असलेली लिंक सिन्नर तालुक्यातील दोडी येथील एका तरुणाला सुमारे पन्नास हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालून गेली. (50 thousand online fraud of Fake link of electricity bill nashik cyber crime news)

सचिन अशोक इलग (३९) राहणार दोडी यांना दोन दिवसांपूर्वी अनोळखी नंबर वरून कॉल आला. हा कॉल महावितरण कंपनीच्या कार्यालयातून करण्याता येत आहे. तुमच्या घरच्या विज बिलाची रक्कम थकीत आहे. तुमच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप वर आलेल्या मेसेज मधील लिंक उघडून त्यावर थकीत वीज बिलाचा तात्काळ भरणा करा.

असे इलग यांना सांगण्यात आले. मी गेल्या महिन्याच्या वीज देयकाचा भरणा नुकताच केला आहे. कोणतीही थकबाकी माझ्याकडे नाही असे इलग यांनी सांगितल्यावर तुम्हाला पाठवलेल्या मेसेजवर लिंक उघडून बघा त्यात तुमची थकबाकी दिसेल असे कॉल करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

crime
Nashik Cyber Crime : पैसे ट्रान्स्फरच्या SMS पासून सावधान! सायबर भामट्यांचा गंडा घालण्याचा नवीन फंडा

कॉल बंद झाल्यावर इलग् यांनी महावितरण कंपनीचे नावे आलेल्या मेसेज मधील लिंक वर क्लिक केले असता पुढच्या मिनिटाला त्यांच्या बँक खात्यावरून 50 हजार रुपये रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज झळकला. त्यानंतर लगेचच त्यांचा मोबाईल सुमारे आठ तास ब्लॉक करण्यात आला. या काळात मोबाईल फोनवर कोणतेही ॲप उघडत नव्हते.

कॉल करता येत नव्हता आणि कॉल येणे देखील बंद झाले होते. त्यामुळे ईलग यांनी घरातील दुसऱ्या फोन वरून मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला तसेच मोबाईल ऑपरेटर कंपनीला कॉल करून माहिती दिली. त्यांनी बँकेला देखील आर्थिक फसवणुकीबाबत तात्काळ सूचना करून बँक खात्यावरील सर्व व्यवहार थांबवण्याची विनंती केली.

तब्बल आठ तासानंतर त्यांचा मोबाईल फोन आपोआप सुरू झाला. ईलग यांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे या फसवणुकी संदर्भात ऑनलाईन तक्रार दाखल केली असून वावी पोलिस ठाण्यात देखील लेखी तक्रार नोंदवली आहे.

crime
Nashik Cyber Crime : पैसे ट्रान्स्फरच्या SMS पासून सावधान! सायबर भामट्यांचा गंडा घालण्याचा नवीन फंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.