Nashik Gangapur Dam : उन्हाळ्यात भारनियमनाची टांगती तलवार; धरणातील 50 ते 65 टक्के साठा शिल्लक

राज्यात अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जवळपास सर्व धरणांतील साठा ५० ते ६५ टक्के शिल्लक आहे.
Nashik Gangapur Dam
Nashik Gangapur Damesakal
Updated on

Nashik Gangapur Dam : राज्यात अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जवळपास सर्व धरणांतील साठा ५० ते ६५ टक्के शिल्लक आहे. यामुळे येत्या उन्हाळ्यात भारनियमन अटळ असल्याचे चिन्ह दिसून येते.

राज्यात सध्या बहुतांश भागात शीतलहरी दिसून येते. (50 to 65 percent of stock remaining in gangapur dam nashik news)

असे असतानाही विजेची मागणी २८ हजार मेगावॉटच्या घरात पोहोचली आहे. तीच मागणी उन्हाळ्यात ३० हजारांच्या घरात पोहोचू शकते. त्यात धरणातील पाण्याच्या साठ्याचे नियोजन जून ते जुलैपर्यंत केलेले असते. आधी पिण्यासाठी, कृषीसाठी व मग औद्योगिक वापरासाठी असल्याने बिकट परिस्थिती उद्‌भवू शकते.

काही वर्षांपूर्वी परळी येथे पाण्याअभावी सर्व संच बंद ठेवायची नामुष्की ओढवली होती. गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेदहाला राज्याची विजेची मागणी २७ हजार ७०० होती; तर राज्याच्या सर्व स्रोतांतून १९ हजार ५११ एवढी वीजनिर्मिती सुरू होती. ‘महानिर्मिती’चे २७ पैकी पाच संच बंद असून, २२ संचांमधून सहा हजार ३६४ मेगावॉट एवढी वीजनिर्मिती सुरू होती.

Nashik Gangapur Dam
Gangapur News : कैलास पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर वर्णी

उरण वायू वीजनिर्मिती केंद्रातून २८९, जलविद्युत केंद्रांमधून ८१२ मेगावॉट अशी ‘महानिर्मिती’ची आठ हजार ६२ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती; तर खासगीचे जिंदाल एक हजार २७० मेगावॉट, अदानी दोन हजार ५३१ मेगावॉट, आयडियल २६७, रतन इंडिया एक हजार ३२४, पायोनियर ४७२ मेगावॉट, इतर स्रोत मिळून १० हजार ७९ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती.

उर्वरित गरज केंद्रातील हिस्सा सात हजार ९२३ मेगावॉटपेक्षा २४३ मेगावॉटने अधिकने उचलून गरज भागवली जात होती. यंदा राज्यातील अनेक धरणांचा साठा कमी असल्याने नाशिक, परळीसह इतर ठिकाणांचे काही संच बंद ठेवण्याची वेळ आली, तर मग राज्यातील भारनियमन अटळ राहील, यात तिळमात्र शंका नाही.

Nashik Gangapur Dam
Gangapur News : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वाहेगाव ते मुद्देशवाडगावच्या रस्त्यावर डांबर

राज्यातील पाच बंद संच

नाशिक औष्णिक वीज केंद्र संच क्रमांक तीन बॉयलर ट्यूब लिकेज, खापरखेडा संच क्रमांक दोन वार्षिक देखभालसाठी बंद, चंद्रपूर संच क्रमांक सात व नऊ तांत्रिक बिघाड, भुसावळ संच क्रमांक तीन सील लायनरचे काम, परळी संच क्रमांक सात तांत्रिक कामासाठी बंद आहेत.

''सध्या तरी तशी परिस्थिती वाटत नाही. जलसंधारण विभाग याबाबत अभ्यास करून रोटेशन देतीलच. महानिर्मितीचे सर्व औष्णिक वीज केंद्रात पाणीबचतीचे नियोजनही योग्य प्रकारे सुरू आहे. उन्हाळ्यात मागणी वाढेल, तेव्हा सर्व संच चालविले जातील.''- संजय मारूडकर, संचालक संचलन

Nashik Gangapur Dam
Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणाच्या पाण्याचा रंग बदलतोय; पर्यावरणप्रेमींना दूषित पाण्याचा संशय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()